court
court 
पश्चिम महाराष्ट्र

अनैतिक प्रेम संबधातून खून; पतीसह आठ जण दोषी 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : अनैतिक प्रेमसंबधातून विडी घरकुल येथील प्रवलिका श्रीमल हिचा खून केल्याप्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी पतीसह सर्व आठ आरोपींना दोषी धरले आहे. बुधवारी (ता. 15) शिक्षेची सुनावणी होणार आहे. 

नरहरी रामदास श्रीमल (वय 34, रा. लक्ष्मीनारायण थिएटरच्या पाठीमागे, श्रीरामनगर, सोलापूर), विनोदा नागनाथ संदुपटला (वय 33, रा. अ विभाग, विडी घरकुल, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), महादेवी बसवराज होनराव (वय 35, रा. अ विभाग, विडी घरकुल, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), अंबुबाई भीमनाव कनकी (वय 38, रा. सुंचु विडी घरकुल, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) यांना खुनाच्या, खुनाचा कट रचल्याच्या व पुरावा नष्ट केल्याच्या अपराधाखाली व बालाजी दत्तात्रय दुस्सा (वय 23, रा. विनायकनगर, सोलापूर), अमर श्रीनिवास वंगारी (वय 25, रा. अ विभाग, विडी घरकुल, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), नरेश अंबादास मंत्री (वय 22, रा. सिद्धाराम मठाशेजारी, विनायकनगर, विडी घरकुल, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), अंबादास किसन ओत्तुर (वय 21, रा. सिद्धाराम मठाशेजारी, विनायकनगर, विडी घरकुल, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) यांना खुनाचा कट रचल्याच्या व खुनाचा पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली दोषी धरण्यात आले आहे. 

यातील आरोपी नरहरी श्रीमल आणि विनोदा संदुपटला यांचे गेल्या दोन वर्षांपासून अनैतिक प्रेमसंबंध असल्याचे नरहरीची पत्नी प्रवलिका हिला माहीत झाले होते. तिने याबाबत माहेरी कळविल्याने तो चिडून होता. त्याच कारणावरून दोघांत रोज भांडणतंटा व्हायचा. नरहरी व विनोदा यांनी प्रवलिका हिचा खून करण्याचे ठरविले. महादेवी व अंबुबाई यांच्यासोबत वेळोवेळी बैठका झाल्या. 12 ऑगस्ट 2017 रोजी खोटा बेबनाव करून पत्नी प्रवलिका ही घरातून भाजी आणण्यासाठी गेली, परत आली नाही म्हणून पोलिसांत तक्रार दिली. 12 ऑगस्ट रोजी नरहरी याने प्रवलिका हिला देवकार्याचा बहाणा करून दुचाकीवरून अंबुबाईच्या घरी आणले. तिथे विनोदा व तिची मैत्रीण महादेवी या दोघी होत्या. नरहरी याने प्रवलिकास खाली पाडले. अंबुबाईने तिचे दोन्ही पाय पकडले. विनोदाने गळ्याला फास दिला. महादेवी तिच्या अंगावर बसली. नरहरीने मानेवर लाथा घातल्या. जीवे ठार मारल्यानंतर तिचा मृतदेह निळ्या रंगाच्या फायबर बॅरलमध्ये टाकून झाकण लावले. आरोपी बालाजी, अमर, नरेश व अंबादास यांच्या मदतीने 13 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास साक्षीदार दयानंद व्हनमारे याच्या वाहनामधून विनोदाच्या घरी आणले. रात्री आठ वाजता घराच्या कंपाउंडमध्ये खड्डा करून प्रवलिका हिला दफन केले. याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 

या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने एकूण 20 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी गुन्ह्याची कबुली ज्या साक्षीदारांसमोर दिली त्यांची साक्ष, तहसीलदार, डॉक्‍टर, आरोपींच्या घराशेजारी राहणारे साक्षीदार, रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल, पंचाच्या साक्षी खटला शाबित करण्यास महत्त्वाच्या ठरल्या. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत तर आरोपीतर्फे ऍड. एम. आय. कुरापाटी, ऍड. ए. ए. ईटकर, ऍड. ए. एन. शेख यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे आणि सहायक पोलिस निरीक्षक एम. एस. भावीकट्टी यांनी केला आहे. कोर्ट पैरवी म्हणून हवालदार शीतल साळवे यांनी मदत केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : 'ईव्हीएम हॅक करतो' म्हणत अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी; एक जण पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT