Murder of the truck driver 
पश्चिम महाराष्ट्र

मालट्रकचालकाचा निंबळकजवळ खून 

सकाळ वृत्तसेवा

नगर : निंबळक बाह्यवळण रस्त्यावर तरुणाचा चाकूने भोसकून आणि गळा आवळून खून करण्यात आला. आज सकाळी नागरिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तत्काळ तपास सुरू केला. 

नवनाथ गोरख वलवे (वय 32, रा. सारोळे कासार, ता. नगर) असे मृताचे नाव आहे. नवनाथ याच्याकडे स्वमालकीची मालट्रक असून, तो स्वत:च ट्रक चालवीत होते. आज सकाळी निंबळक बाह्यवळण रस्त्याजवळ त्याचा मृतदेह असल्याची माहिती एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांना मिळाली. ते पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या पोटामध्ये चाकूने भोसकून वार आणि गळा दाबून खून केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. 

दरम्यान, त्याचा खून कोणी व कशासाठी केला, याचा पोलिस शोध घेत आहेत. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

ट्रक लुटून खून केल्याचा संशय 

नवनाथ वलवे याची स्वमालकीच्या ट्रकमध्ये अन्य पार्टनर आहे. मालट्रकमध्ये इंदापूर येथे दूध पावडर भरून तो कटक (ओडिशा) येथे चालला होता. निंबळक बाह्यवळण रस्त्यावर ट्रक लुटून त्याचा खून केला. मालट्रकसह 85 लाख रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला, असा संशय व्यक्त केला जात आहे. 

अारोपींचा शाेध लागेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही ः वलवे

मला काहीच माहिती नव्हते. मुलाचा खून झाल्याचे समजल्यानंतर मी हादरून गेलो होतो. आरोपींचा शोध लागेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. 
- गोरख वलवे, मृत तरुणाचे वडील 

चक्का जाम आंदाेलन करणार ः परदेशी

महामार्गावर मालट्रक लुटून तरुणाचा खून होतो, ही दुर्दैवी घटना आहे. येत्या दोन दिवसांत पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार संघटनेतर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. 
- विनोदसिंग परदेशी, जिल्हाध्यक्ष, प्रहार संघटना 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT