husen dalwai 
पश्चिम महाराष्ट्र

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यातून मुस्लिम टार्गेट 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा मुसलमानांच्या विरोधात नसला तरी मुसलमान यामध्ये टार्गेट आहेत, समाजामध्ये भाजपला याच माध्यमातून गोंधळ घालायचा आहे. या माध्यमातून गोळवलकर गुरुजींचे स्वप्न पूर्ण करण्याचा डाव असल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी आज सोलापुरातील पत्रकार परिषदेत केला. 
हेही वाचा - ज्येष्ठ गायिका भारती वैशंपायन यांचे निधन 
नागरिकत्व कायद्याला आता केवळ मुसलमानांचाच विरोध होत आहे असे समजण्याचे कारण नाही. आता स्वपक्षातील नेत्यांचा सुद्धा विरोध होत आहे, मोठ्या प्रमाणावर यामध्ये विद्यार्थी उतरले आहेत. हा कायदा आणायचा होता तर तो सरळ आणता आला असता. नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून समाज समाजात केवळ तेढ निर्माण करण्याचा व समाजात फूट पडावी म्हणून यामध्ये अन्य जातींची नावे टाकल्याचाही आरोप दलवाई यांनी केला. 
हेही वाचा - वाल्मिकीचा वाल्या होऊ देऊ नका 
महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे बनलेले सरकार संपूर्ण देशभरात मॉडेल म्हणून जाण्यासाठी शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील सरकार पाच वर्षे तर टिकेलच परंतु पुढची 25 वर्षे हटणार नाही असा विश्‍वासही दलवाई यांनी व्यक्त केला. इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीचे समर्थन शिवसेनेने केले होते. आणीबाणीनंतर लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी कॉंग्रेसला मदत केली होती. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी ज्या वेळी निवडणूक लढविली होती त्यावेळी निवडणूक न लढविता सेनेने कॉंग्रेसला मदत केली होती. त्याबदल्यात अंतुले यांनी सेनेला विधानपरिषदेच्या तीन जागा दिल्या असल्याची आठवणही दलवाई यांनी सांगितली. 
हेही वाचा - हक्काचा साखर कारखाना बंद असल्यावर काय होते? शेतकऱ्यांची परवड... 
पंतप्रधान मोदी आहेत की भागवत? 
नागरिकत्व कायदा मागे घेता येणार नाही असे मोहन भागवत जर म्हणत असतील तर मोहन भागवत हे देशाचे पंतप्रधान आहेत काय? असा सवाल दलवाई यांनी उपस्थित केला. मोहन भागवत देशाच्या सरकारला डिक्‍टेट करत आहेत हेच यामधून दिसते. हे सरकार भाजप चालवत आहे की मोहन भागवत हाच प्रश्न निर्माण होत असल्याचेही दलवाई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT