शेवगाव : कोरोनाच्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या कुटुंबावर आणि रस्त्यावरील भिकारी, मनोरुग्णांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, अशा कठीण प्रसंगी मदतीचा हात पुढे करून शहरातील अनेकांनी आत्मीयतेचे आणि सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवले. त्यांच्या मदतीमुळे गरजूंना अन्न, किराणा सामान व मास्क असे अत्यावश्यक साहित्य मिळाले. त्यामुळे त्यांचे जगणे सुसह्य झाले.
कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ता. 14 एप्रिलपर्यंत सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहर व तालुक्यातील रस्ते व दुकाने पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे रोज मोलमजुरी करून उपजीविका करणारे मजूर आणि रस्त्यावर भीक मागून पोट भरणारे भिकारी, मनोरुग्णांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत शहरातील अशा अनेक कुटुंबांची होत असलेली उपासमार पाहून संवेदनशील माणुसकीची जाणीव ठेवत अनेकजण पुढे आले आहेत. त्यांनी अन्नाची पाकिटे, किराणा सामान, अत्यावश्यक मास्क, सॅनिटायझर गरजवंताला देऊ केले आहेत.
माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुनील काकडे यांनी खंडोबानगर परिसरातील गोरगरीब व मजूर कुटुंबास किमान एक महिना पुरेल असे किराणा साहित्य पोच केले. त्यांना जतीन इनामदार, गणेश काकडे, राधेश्याम कुऱ्हे, प्रवीण महामुनी, अमोल जोशी यांनी सहकार्य केले. आंबेडकर चौकात वडापावची गाडी लावणाऱ्या इमरान व इरफान पठाण या दोघा भावांसह इस्माईल पठाण या फिटरकाम करणाऱ्या तरुणाने रस्त्यावरील गोरगरीब, विकलांग, भिकारी व मनोरुग्णांच्या दोन वेळेच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.