पश्चिम महाराष्ट्र

आरोपी भवाळचा घटनेशी संबंध नाही

सकाळवृत्तसेवा

नगर - कोपर्डी येथील बलात्कार व खून या घटनेशी आरोपी संतोष भवाळ याचा काहीही संबंध नाही. त्याबाबतचे पुरावे आम्ही सादर केले आहेत, असे म्हणणे आरोपी भवाळतर्फे अंतिम युक्तिवाद करताना वकील बाळासाहेब खोपडे व विजयालक्ष्मी खोपडे यांनी आज न्यायालयात मांडले.

विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर अंतिम युक्तिवाद सुरू आहे. दोन्ही वकिलांनी सांगितले, की घटनास्थळाचा नकाशा तयार केला; मात्र त्यात अनेक त्रुटी आहेत. दोषारोपपत्रासोबत नकाशा जोडतानाही दोष होता. नकाशा संगणकीय असल्याने त्याच्या सत्यतेच्या पडताळणीचे प्रमाणपत्र देणे गरजेचे होते, ते दिले नाही.

असाच प्रकार घटनास्थळाच्या छायाचित्रांबाबतही आहे. छायाचित्रे ही संगणकीय प्रिंट आहेत. त्यांच्या सत्यतेचे पडताळणी करणारे प्रमाणपत्र दिलेले नाही. साक्षीदार ज्या कठड्यावर बसले, त्याची उंची, लांबी नाही. त्याचा पंचनामाही नाही. फिर्यादी अवघ्या अर्ध्या तासात घटनास्थळी जातो, आरोपीचा पाठलाग करतो, साडेचारशे मीटर पळत येऊन त्याच्या आईशी बोलतो, हे विशेष असल्याचे सांगत फिर्यादीचा "सुपरमॅन' असा उल्लेख खोपडे यांनी केला. पीडित मुलीच्या मैत्रिणीचे घर पाचशे मीटरवर असताना आणि तेथे पाचशे लोक घटनास्थळी जमलेले असताना मैत्रिणीला घटना थेट रात्री अकरा वाजता कशी कळते? शिवाय, या मैत्रिणीने आरोपी संतोष भवाळला ओळखले नाही. भवाळ त्या गावचा नाही. त्याचा या घटनेशी काही संबंध नाही, असा दावा खोपडे यांनी केला. घडलेली घटना दुर्दैवी आहे. निरपराध्याला शिक्षा होऊ नये, यासाठी वकील म्हणून खऱ्या आरोपीपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करणे आमचे काम आहे. त्यामुळे आम्ही सहकार्य करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चिखलात चकरा कशा मारल्या?
घटना घडण्याआधी आरोपींनी दुचाकीवरून चकरा मारल्याचे सांगितले जात आहे. मात्र, घटनेनंतर जप्त केलेल्या दुचाकीला चिखल लागला होता. पोलिस ठाण्याच्या आवारात दुचाकी आणली असताना पाऊस येऊन दुचाकीचा चिखल निघून गेला, असे सांगितले जात आहे. असे असेल, तर चिखलात आरोपींनी चारीच्या रस्त्याने दुचाकीवरून चकरा कशा मारल्या, असा प्रश्‍न योहान मकासरे यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT