संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
पश्चिम महाराष्ट्र

संगमनेरला विहिरीत आढळला कुजलेला अनोळखी इसमाचा मृतदेह

हरिभाऊ दिघे

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील वडगावलांडगा शिवारात वापरात नसलेल्या विहिरीत कुजलेल्या स्थितीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. बुधवारी (दि. १५) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती अशी की, वडगावलांडगा शिवारात भाऊसाहेब नामदेव डोंगरे यांच्या मालकीच्या वापरात नसलेल्या विहिरीत अंदाजे ४० वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना रहीवाशांना आढळून आला. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.

पोलिस पाटील बाळासाहेब गणपत खरात यांनी पोलिसांत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशनाला अकस्मात मृत्यू रजि. क्र. ८९ / २०१७ सीआरपीसी १७४ प्रमाणे नोंद नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विष्णू आहेर अधिक तपास करीत आहे. सदर व्यक्ती कोण - कुठली ? हा प्रकार आत्महत्या की घातपात ? याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा होत असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT