Nagar-Pune highway closed 
पश्चिम महाराष्ट्र

नगर-पुणे महामार्ग बंद 

सूर्यकांत वरकड

नगर : नगर-पुणे रस्त्यावरील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी रोजी राज्यभरातून लोक वाहनांसह येतात. त्यामुळे वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता गृहीत धरून नगरहून पुण्याकडे जाणारी आणि पुण्याहून येणारी वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आली आहे, असे आज पोलिसांकडून सांगण्यात आले.

 
यंदा राज्यभरातून विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी 10 ते 12 लाख लोकांची गर्दी होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. हा जनसमुदाय खासगी बस, एसटी बस, चारचाकी, दुचाकी आदी वाहनांतून येतो.

पुणे-नगर महामार्गावर भीमा कोरेगाव ते पेरणे फाटा यादरम्यान वाहतुकीची 
वारंवार कोंडी होते. त्यामुळे पुणे महामार्ग वाहतूक पोलिस व पुणे पोलिसांनी 31 डिसेंबर रोजी रात्री बारापासून एक जानेवारी रोजी रात्री साडेदहापर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे. 
 


पर्यायी मार्ग असा 
- नगरकडून पुण्याकडे जाणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकण मार्गाने पुणे व मुंबईकडे जातील. 
- पुण्याकडून नगरकडे येणारी वाहने येरवडा-विश्रांतवाडीमार्गे आळंदी, चाकणमार्गे शिक्रापूर अशी पुढे येतील किंवा खराडी बायपासमार्गे हडपसर, पुणे-सोलापूर रस्त्याने केडगाव चौफुल्यामार्गे न्हावरे फाटा शिरूरकडे येतील. 
- हडपसर येथून आळंदी, नगर, चाकण, लोणीकंद भागात जाणारी वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळणमार्गे येरवडा-विश्रांतवाडीमार्गे आळंदीकडे जातील. 
 


पार्किंग व्यवस्था अशी 
- नगर, शिक्रापूरकडून जाणाऱ्या वाहनांसाठी ः पार्किंग क्रमांक एक - तोरणा पार्किंग बजरंगवाडी, पार्किंग क्रमांक दोन - जाधवनगर चाकण रोड, पार्किंग क्रमांक 3 - कृष्णलीला मंगल कार्यालय, सणसवाडी. 
- पुणे-लोणीकंदकडून येणाऱ्या वाहनांसाठी ः लोणीकंद कुस्तीचे मैदान (चारचाकी वाहने), शिवतेज ऑटो गॅरेजशेजारी शेतजमीन लोणीकंद (दुचाकी). 
- आळंदीकडून येणारी सर्व वाहने ः संगमेश्वर हॉटेल, तुळापूर फाटा येथील मोकळ्या शेतजमिनी 
- पी. एम. पी. एल. बस पार्किंग व बस डेपो, सरकारी वाहने ः ओ. पी. पिनाकिलशेजारी, हॉटेल श्रावणीसमोर मोकळ्या जागेत, पेरणे टोल नाक्‍याशेजारी 
- डोंगरगाव, उरळी कांचनकडून येणारी वाहने ः पेरणे गावाच्या पाण्याच्या टाकीशेजारी 
- आळंदी बाजूकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी ः लोणीकंद थेऊर रस्ता वढू खुर्द रस्त्यावरील मोकळी जमीन 
- राखीव : खंडोबाचा मळा 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil: हपकिनच्या कामकाजाबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, तुकाराम मुंडे यांच्याकडेच पदभार ठेवा: वळसे पाटील यांची विधिमंडळात मागणी

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: विकेंडला रायगडला जाणार आहात? देवकुंड, ताम्हाणीसह अनेक पर्यटनस्थळांवर लागू झाले कडक निर्बंध

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT