Nagpanchami celebrated in Shirala esakal
पश्चिम महाराष्ट्र

Shirala Nagpanchami : अलोट गर्दी अन् DJ च्या ठेक्यावर बेफाम तरुणाई; बत्तीस शिराळ्यात जगप्रसिद्ध नागपंचमी उत्साहात साजरी

महाजन कुटुंबाकडे नागपंचमीच्या पालखीचा मान

सकाळ डिजिटल टीम

कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्सव शांततेत झाला. सकाळी सहापासून नागमंडळे नागप्रतिमा घेऊन अंबामाता मंदिरात पूजेसाठी जात होते.

शिराळा : पावसाची उघडीप आणि तरुणांनी वाद्याच्या तालावर धरलेला ठेका, यामुळे शिराळ्यात काल नागपंचमीचा (Nag Panchami Shirala) एकच जल्लोष होता. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत हजारो भाविकांच्या साक्षीने शिराळची नागपंचमी घरोघरी नागप्रतिमेचे पूजन करून उत्साहात साजरी करण्यात आली.

कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्सव शांततेत झाला. सकाळी सहापासून नागमंडळे नागप्रतिमा घेऊन अंबामाता मंदिरात पूजेसाठी जात होते. महिलांनीही अंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी केली. अकराच्या सुमारास प्रणव महाजन व त्यानंतर रामचंद्र महाजन यांच्या घरात नागप्रतिमा व मानाच्या पालखीचे विधिवत पूजन करून पालखी काढण्यात आली.

त्यानंतर नागप्रतिमेच्या मिरवणुकीस सुरवात झाली. महाजन कुटुंबाकडे नागपंचमीच्या पालखीचा मान आहे. पालखीमध्ये नागाची तांब्याची प्रतिमा पूजेसाठी देण्याचा मान शिराळा येथील पोतदार कुटुंबाकडे वंशपरंपरागत आहे. ही परंपरा सुमंत पोतदार पुढे चालवत आहेत. उपजिल्हा रुग्णालयानजीक नगरपंचायतीने नियंत्रण कक्ष उभारला होता.

ठिकठिकाणी स्वागतकक्ष उभारून नागमंडळांचे स्वागत करण्यात आले. शिराळा युवक संघटनेने मंडळांचे स्वागत केले. अंबामाता मंदिर व मिरवणूक मार्गावर कडक पोलिस बंदोबस्त होता. यावेळी पोलिस अधीक्षक बसवराज तेली व मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएस अधिकारी राहुल चव्हाण, उपाधीक्षक मंगेश चव्हाण, मनीषा कदम, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शामला खोत-पाटील, विभागीय वनाधिकारी दिलीप भुरके, उपवनसंरक्षक नीता कट्टे.

तसेच सहायक वनसंरक्षक डॉ अजित साजणे, वनक्षेत्रपाल महांतेश बगले, डॉ. सुनील लाड, कमलेश पाटील, महेश झांझुरणे, इंद्रजित निकम, रणजित गायकवाड, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सहायक निरीक्षक जयसिंग पाटील, शिराळा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी भेट देऊन या मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवले. पोलिस व वन विभाग अशा ६०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त होता.

व्हिडिओ चित्रीकरण, ड्रोन व सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच सोशल मीडियावर करण्यात येणाऱ्या गतिविधींवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला होता. सात आरोग्य पथके तयार होती. सर्पदंशाच्या ११०० लसी उपलब्ध होत्या. सांगली आगारचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, आगार व्यवस्थापक संजय चव्हाण यांनी एसटी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन पाहिले.

भाविकांसाठी ज्यादा गाड्यांचे नियोजन केले होते. आमदार मानसिंगराव नाईक, खासदार धैर्यशील माने, भाजपनेते सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, रणजितसिंग नाईक, अॅड. भगतसिंग नाईक यांनी नाग मंडळांना शुभेच्छा दिल्या.

अल्पोपाहार वाटप

शिराळा तालुका कामगार परिषदेतर्फे अध्यक्ष मारुती रोकडे यांनी पोलिस, महावितरण, सफाई, आरोग्य, वनविभाग व अन्य कर्मचाऱ्यांना अल्पोपाहाराचे वाटप केले.

पावसाची उघडीप अन् गर्दीच गर्दी

पावसाने उघडीप दिल्याने यंदा गल्ली-बोळांसह संपूर्ण मिरवणूक मार्ग भाविकांच्या गर्दीने खचाखच भरला होता. वाद्ये, नेत्रदीपक रोषणाई आणि कागदी फवारे यामुळे प्रत्येक मंडळांच्या मिरवणुकीत रंगत आली होती. त्या ठेक्यावर तरुणाईने बेफाम ठेका धरला होता.

लक्षवेधी डिजिटल बॅनर

नागपंचमी उत्सवाचे निमित्त साधून आगामी नगरपंचायत निवडणुका डोळ्यामोर ठेवून राजकीय पक्ष व युवा नेत्यांनी उभारलेले डिजिटल बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघर साधू हत्याकांडाचे आधी आरोप केले, आता पक्षात का घेतलं? CM फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, भाजपकडून प्रवेशाला स्थगिती

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

CM Devendra Fadnavis: मित्रपक्षांना शत्रू समजू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, युती म्हणून एकत्र लढणार

Kolhapur News: कुरुंदवाडच्या रणांगणात कलाटणी! ठाकरे गट शाहू आघाडीसोबत; काँग्रेस ‘एकाकी’

Video Viral: वाहत्या पुरात हरीणाला हत्तीनं दिलं जीवनदान, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT