shrirampur palika 
पश्चिम महाराष्ट्र

छत्रपतींच्या नावावरून "या' पालिकेत गदारोळ 

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : स्वच्छ भारत अभियानात शहराला 44 लाखांचा निधी जाहीर झाला. हा निधी योग्य पद्धतीने खर्च करावा. स्वच्छतेच्या जागृतीऐवजी प्रत्यक्ष स्वच्छतेवर खर्च करण्याचा निर्णय आजच्या पालिकेच्या सभेत सर्वानुमते झाला. 


नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची आज सभा झाली. उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रभारी मुख्याधिकारी श्‍यामराव जाधव उपस्थित होते. पालिका अधिकाऱ्यांनी कचरासंकलनावर होणाऱ्या खर्चाची वेळोवेळी माहिती घ्यावी. अनेक प्रभागांतील कचरा नियमित उचलला जात नसल्याने संबंधित ठेकेदारांच्या ठेक्‍यातून पैशांची कपात करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर आदिक यांनी ठेकेदाराचे सुमारे 2 लाख रुपये कपात करण्याचा आदेश दिला. 

शिकलकरी समाजाच्या लोकवस्तीत स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्याची मागणी आमदार लहू कानडे यांनी केली होती. मात्र, ही बाब नगराध्यक्षांनाच माहीत नसल्यामुळे विरोधकांनी पालिका प्रशासनास धारेवर धरले.

त्यानंतर हे प्रकरण शासकीय मंजुरीसाठी पाठविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागाची सुमारे 14 कोटींची वसुली थकीत असून, संबंधितांवर कारवाई करण्यावर चर्चा झाली. पुढील काळात शहरासाठी 133 किलोमीटर अंतराची नव्याने पाइपलाइन केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्‍न नगरसेवक मुझफर शेख यांनी मांडला. 

पालिकेच्या जागेचे भाडे आकारणाऱ्या ठेकेदाराची थकबाकी तत्काळ वसूल करून बंद 500 टपऱ्या ताब्यात घेऊन पालिकेचा महसूल वाढवावा, अशी सूचना आदिक यांनी केली. शहरातील बाजार रस्त्यावर भरला जात असून, त्यावर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक संजय फंड, श्रीनिवास बिहाणी यांनी केली. 

शिवरायांच्या नावावर राजकारण नको : ससाणे 
बेलापूर रस्त्यावरील कमानीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यावरून सभागृहात गदारोळ झाला. सत्ताधारी नगरसेवकांनी या मागणीला समर्थन देत जल्लोष केला. त्यावर पालिकेने या कमानीचे बांधकाम केलेले नसल्याने नाव ठरविणारे हे कोण, असा सवाल नगरसेवक संजय फंड यांनी केला. महाराजांच्या नावावर राजकारण करू नका. नाव देण्यास कोणाचाही विरोध नाही. कमानीचे बांधकाम करणाऱ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यावा, असे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी स्पष्ट केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Chavan Audio Clip : “थांबा जरा, शांत रहा, शिव्या खा”; अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ

पुण्यातील पेठांमध्ये राहणं शिक्षा, नागरिक पळून जातायत : विद्यानंद बापट

अमेरिकेत अश्विनी भावेंच्या घरी पोहोचला बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता, जंगी स्वागत, एकत्र जेवण अन्...

Navi Mumbai: जनतेच्या पैशांवर 'अमेरिका वारी', नवी मुंबईच्या महापौरांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात

Maharashtra Dams : सर्वाधिक धरणे, तरीही पाणी समस्या का? केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांचा सवाल

SCROLL FOR NEXT