Nana Patekar will arrive in Belgaum marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

नाना पाटेकर 'या' कारणासाठी येणार बेळगावात...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - कलामहर्षी के. बी. कुलकर्णी जन्मशताब्दी महोत्सव ४ ते ६ फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन ज्येष्ठ रंगकर्मी नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवानिमित्त वरेरकर नाट्य संघ व रिझ थिएटरमध्ये कार्यक्रम होणार आहेत.

मंगळवारी (ता. ४) सकाळी ९.३० वाजता वरेरकर नाट्यसंघातील आर्ट गॅलरीतील चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते होईल. रिझ थिएटरमध्ये सकाळी १०.३० वाजता जन्मशताब्दी महोत्सवाचे उद्‌घाटन नाना पाटेकर करतील. स्मृतिग्रंथाचे प्रकाशन नाना पाटेकर, रवी परांजपे व दतात्रय पाडेकर यांच्या हस्ते होईल. पत्रकार किरण ठाकूर अध्यक्षस्थानी असतील. दुसऱ्या सत्रात श्री. परांजपे यांचे लघुपट प्रदर्शन व जीवन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे. यानंतर विकास पाटणेकर यांना कला गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. 

बुधवारी (ता. ५) सकाळी १०.३० वाजता ‘चित्र असावे कसे’ या विषयावर गोव्यातील डॉ. गोविंद काळे, कोल्हापूरमधील चंद्रकांत जोशी व पुण्यातील मारुती पाटील यांचा कार्यक्रम होईल. दुपारी ३ वाजता मुंबईतील वासुदेव कामत यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी ५ वाजता पारितोषिक वितरण, सायंकाळी ६ वाजता स्लाईड शो दाखविण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. ६) जैतनमाळमधील संकल्पभूमीत सकाळी ९ ते ४ पर्यंत निमंत्रित चित्रकारांचे प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्‌घाटन नवी दिल्लीतील ललित कला केंद्राचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचर्णे यांच्या हस्ते होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT