Satara
Satara 
पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यात 'एकच राजे बाबा राजे'; नरेंद्र पाटील यांच्याकडून घोषणा (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

सातारा : भाजप-शिवसेना युतीचे उदयनराजेंच्या विरोधात असलेले उमेदवार नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा दिल्यावर नरेंद्र पाटील यांनी चक्क 'एकच राजे बाबा राजे' या नावाने घोषणाबाजी केली.

सातारा लोकसभा मतदार संघात सध्या नरेंद्र पाटील आणि उदयनराजे यांच्यात लढत होणार हे नक्की झाले आहे. आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंच्या विरोधात लोकसभेचा अर्ज साताऱ्यातून भरला. गेल्या काही दिवसांपूर्वी साताऱ्यात येऊन नरेंद्र पाटील यांनी उदयनराजें बंधू आ. शिवेंद्रराजे यांच्या बरोबर एकत्र मिसळ खाऊन उदयनराजेंना झटका दिला होता. आज त्याच नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमात शिवेंद्रराजेंची गळाभेट घेतली. एवढ्या वरच न थांबता त्यांनी चक्क एकच राजे बाबा राजे अशा जोरदार घोषणा दिल्या. या घोषणाबाजी नंतर आमदार समर्थकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवेंद्रराजे आणि नरेंद्र पाटील यांची ही झालेली भेट उदयनराजे आणि समर्थकांची झोप उडवणारी असेल, असे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT