narsinhwadi datta mandir sakal
पश्चिम महाराष्ट्र

Narsinhwadi News : एकाच दिवशी दोनदा दक्षिणद्वार; नृसिंहवाडीत स्नान पर्वणीचा लाभ

कृष्णा, पंचगंगा नदीपात्रामध्ये दिवसभरामध्ये आठ फूट पाणी वाढल्याने यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा दत्त मंदिरात मंगळवारी पहाटे सव्वाचार वाजता झाला.

सकाळ वृत्तसेवा

नृसिंहवाडी - कृष्णा, पंचगंगा नदीपात्रामध्ये दिवसभरामध्ये आठ फूट पाणी वाढल्याने यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा दत्त मंदिरात मंगळवारी पहाटे सव्वाचार वाजता झाला. पुन्हा चार तासांत पाणी ओसरल्याने उतरता दक्षिणद्वार सोहळा सव्वाआठच्या सुमारास झाला. यामुळे इतिहासात प्रथमच एका दिवशी चार तासांच्या अंतराने दोन दक्षिणद्वारात अभूतपूर्व सोहळा झाला.

भाविकांनी कृष्णा नदीपात्रात पहाटे स्नान करून दक्षिणद्वार सोहळ्याच्या निमित्ताने सोहळ्याच्या पर्वणीचा लाभ घेतला. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. गेल्या २४ तासांत आठ फुटांनी पाणी पातळीत वाढ झाल्याने दत्त मंदिरात पाणी आल्याने पहिला दक्षिणद्वार झाला.

शिरोळ, तेरवाड, राजापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कुरुंदवाड येथील अनवडी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद आहे. दत्त मंदिरातील ओसरीवर आज सकाळी कृष्णेचे पाणी आले. सायंकाळी पालखी वेळी दोन ते अडीच फूट पातळी होती. त्या पाण्यातूनच दत्त महाराजांच्‍या उत्सव मूर्तीचा पालखी सोहळा झाला.

भाविकांनी पाण्यातून वाट काढत घेत दत्त दर्शन घेतले. आज पहाटे सव्वा चार वाजता पहिला दक्षिणद्वार सोहळा झाला. चार तास पाणी दत्त मंदिरात श्रींच्या चरण कमलावर राहिले व परत सव्वा आठ वाजता उतरता दक्षिणद्वार सोहळा झाला.

दत्त देवस्थानचे वैभव काळू पुजारी यांनी मंदिराचे साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना केल्याची माहिती दत्त देवस्थानचे विश्वस्त पांडुरंग पुजारी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Viral Video: मुसळधार पावसातही लोकल सुस्साट, पश्चिम रेल्वेने शेअर केला व्हिडिओ; लोक म्हणाले- हेच मुंबईचे स्पिरिट !

Mumbai Heavy Rain : अंधेरीत ४ फूट पाणी, सबवे ३ तासांपासून बंद; गटाराचं झाकण तुटलं, पावसाने नागरिकांचे हाल

Dmart Thefts: खरेदी कमी, चोरी जास्त, डीमार्टमध्ये सर्वात जास्त चोरी कोणत्या वस्तूंची होते?

Video: 'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटने पुन्हा दिला 'तो' सीन; अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Updates : आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा- मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT