Nashik officer arrested for taking bribe in Shirdi
Nashik officer arrested for taking bribe in Shirdi 
पश्चिम महाराष्ट्र

नाशिकचे अधिकारी शिर्डीत लाच घेताना पकडले

सूर्यकांत वरकड

नगर : अनुसूचित जमातीच्या जातवैधता प्रमाणपत्रासाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक येथील जातपडताळणी समितीचे उपसंचालक, विधी अधिकारी व अन्य दोघांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. शिर्डी येथे मध्यरात्री (ता.5) ही कारवाई करण्यात आली.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपसंचालक रामचंद्र रतिलाल सोनकवडे (रा. नाशिक), ऍड. शिवप्रसाद मुकुंदराव काकडे (जातपडताळणी समिती सदस्य, नाशिक), विनायक ऊर्फ सचिन उत्तमराव महाजन (रा. वसंत विहार, सिडको चौक, नाशिक), मच्छिंद्र मारुती गायकवाड (वय 48, प्रयोगशाळा सहायक, रा. शिवाजीनगर, नवनागापूर, नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी : अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्र पडताळणीसाठी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. शिर्डीत हे पैसे देण्याचे ठरले. यादरम्यान, तक्रारदाराने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. त्यानुसार बुधवारी (ता.4) मध्यरात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिर्डीत सापळा रचला. तेथील एका हॉटेलसमोर मच्छिंद्र गायकवाड व विनायक महाजन यांना पंचांसमोर पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने मध्यरात्री पकडले. रामचंद्र सोनकवडे व ऍड. शिवप्रसाद काकडे यांच्या सांगण्यावरून ही लाच मागितल्याचे त्यांनी सांगितले.

पथकाने वरील चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलिस निरीक्षक श्‍याम पवरे, पोलिस निरीक्षक दीपक करांडे, हेडकॉन्स्टेबल तन्विर शेख, प्रशांत जाधव, रमेश चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 

नाशिकचे अधिकारी शिर्डीत कसे?
अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना जातपडताळणीसाठी नाशिक येथील जातपडताळणी कार्यालयात प्रस्ताव सादर करावा लागतो. तेथून त्यांना जातवैधता प्रमाणपत्र दिले जाते. तक्रारदारानेही नाशिक येथे प्रस्ताव दाखल केला होता; मात्र नाशिकचे पथक शिर्डीत आले कसे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT