Covid Vaccine Sakal
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा आदेश: लसीकरण यादीत नव्या आठ वर्गाचा समावेश

महेश काशीद

बेळगाव : प्राध्यान्याने कोरोना प्रतिबंध लसीकरण (Corona vaccination) यादीत आणखी आठ वर्गांचा समावेश शासनाने केला आहे. सोमवारी (ता.७) याबाबत आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून (National Health Mission)बजाविण्यात आला आहे. या यादीत संसर्ग होण्याची शक्यता अधिक असलेल्या घटकांना प्राध्यान्याने लशी देण्याचा उल्लेख आहे. दरम्यान, नवीन यादीत तृतियपंथिय, वारांगणा, जैन साधू-साध्वी, वृतपत्र विक्रेत्यांसह इतर वर्ग समाविष्ट आहेत.

राज्यात कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण वाढविले जात आहे. पण, ते करताना ज्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यांना पहिल्यांदा लस देण्याबाबत नियोजन केले जात आहे. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, शासकीय कर्मचारी, कोरोना योध्दांना लशी दिल्या जात आहेत. त्यासोबत १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण घोषित केले. पण, लशींचा अपुरा पुरवठा आणि मागणी अधिक असल्यामुळे प्रत्येकाला लस मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यासाठी १८ ते ४४ या वयोगटामध्ये प्राध्यान्य ठरवून लशींचे नियोजन सुरु आहे. दिव्यांगासाठी लसीकरणाला सोमवारी (ता.७) चालना दिली. त्यासोबत आता न्यूक्लिअर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ((एनपीसीआयएल) येथे सेवा बजाविणारे कर्मचारी, नेव्हल बेस सिव्हीलीयन, तृतियपंथिय, वारांगणा, जैन साधू-साध्वी, सलून व्यावसायिक (सविता समाज), ब्युटी पार्लर चालविणारे आणि तेथील कर्मचारी, इलेक्ट्रीशियन व प्लबंर, वृत्तपत्राचे एजंट, वृत्तपत्र विक्रेते आणि खासगी वैद्यकीय प्रतिनिधी (प्रायव्हेट मेडिकल रिप्रेझेटेटिव्ह) आदींना प्राध्यान्याने लस देण्याचे आदेश आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी ७ जूनला याबाबतचा आदेश बजाविला आहे. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, आरसीएचओ आणि लसीकरण अधिकाऱ्यांना या आदेशाच्या कार्यवाहीच्या सूचना आहेत. किती जणांनी लस घेतली आहे. किती जणांना लस देणे बाकी आहे, त्याची यादी करून त्यानुसार प्राध्यान्याने लशी उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे.

प्राध्यान्याने लसीकरणासाठी या वर्गाचा समावेश

-न्यूक्लिअर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमधील ((एनपीसीआयएल) कर्मचारी

-वृत्तपत्राचे एजंट, वृत्तपत्र विक्रेते

-खासगी वैद्यकीय प्रतिनिधी

-तृतियपंथिय, वारांगणा

-जैन साधू-साध्वी

-सलून व्यावसायिक (सविता समाज), ब्युटी पार्लर

-इलेक्ट्रीशियन, प्लबंर

-नेव्हल बेस सिव्हीलीयन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT