ncp logo 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरातील बंडखोरांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे ऍड. मराठे 

प्रमोद बोडके

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहा सदस्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारा विरोधात मतदान केले होते. या सदस्यांना अपात्र करावे अशी मागणी गटनेते बळिराम साठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीवर झालेल्या आजच्या सुनावणीत राष्ट्रवादीने पुढील तारीख मागितली. बंडखोरांच्या विरोधात बाजू मांडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता ऍड. उमेश मराठे यांची नियुक्ती केली आहे. 
हेही वाचा - दादांचा आदेश पाळला ; सांगलीच्या महापौर, उपमहापौरांचे राजीनामे 
नूतन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदाचा पद्‌भार घेतला. हा पदभार घेण्यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली. सुनावणीपूर्वीच राष्ट्रवादीने पुढील तारीख मागितल्याने डॉ. भोसले म्हणाले तुम्हाला पुढची तारीख आता नूतन जिल्हाधिकारी देतील. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या प्रकरणात आता जिल्हाधिकारी आणि राष्ट्रवादीचे वकील बदलल्याने पुन्हा एकदा या प्रकरणाची नव्याने सुरवात होणार आहे. 
हेही वाचा - जिल्हाधिकारी शंभरकरांनी स्वीकारला सोलापूरचा पदभार 
राष्ट्रवादी कॉंग्रेसने यापूर्वी त्यांची बाजू मांडण्यासाठी ऍड. इंद्रजित पाटील, ऍड. बाबासाहेब जाधव आणि ऍड. प्रवीण पाटील यांची नियुक्ती केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर सदस्य शितलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सुनंदा फुले, महानंदा वाघमोडे, गणेश पाटील आणि अरुण तोडकर या सदस्यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी ऍड. दत्तात्रेय घोडके, नितीन खराडे व सचिन भांजी या वकिलांची नियुक्ती केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत बंडखोर सदस्यांच्या वकिलांनी प्रभावी कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष व करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांच्या विरोधात बंडखोर सदस्य अरुण तोडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरही आज सुनावणी झाली नाही. या दोन्ही प्रकरणांवर एकत्रित सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Ambajogai Crime : अडीच वर्षाच्या चिमुरडीवर १३ वर्षाचा अल्पवयीन मुलाचा अत्याचार; मुलावर गुन्हा दाखल

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT