Sharad Pawar 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : त्यांनी संघाची हाफ पँट, काळी टोपी घालू नये एवढीच अपेक्षा : पवार

सकाळवृत्तसेवा

नातेपुते : यशवंतराव चव्हाण, वसंतदादा व मी आम्ही सर्वांनी शंकरराव मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांना मदत केली. शंकरराव मोहिते पाटील यांनी संघर्ष केला. ताठ मानेने जगले. नवीन पिढी मात्र आज आपल्या वडिलांना भाजपमध्ये मांडीला मांडी लावून बसवत आहे. त्यांची काळजी वाटते. त्यांनी संघाची हाफ पँट व काळी टोपी घालू नये, एवढीच अपेक्षा आहे, असे शरद पवार म्हणाले.

मी केवळ ऊस धंद्याचे पाहतो, असे अकलूजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्या वेळी त्यांच्या मंचावर ज्यांनी विजय शुगर बुडविला ते साखर धंदेवालेच बसले होते. सहकारमहर्षी कारखान्याची आजची अवस्था पाहा. कुल यांच्या भीमा-पाटस कारखान्याचीही अवस्था पाहा. या कारखान्यातील कामगारांचा 22 महिन्यांचा पगार थकला आहे. असे कर्तबगार लोक घेऊन मोदी सभा गाजवत आहेत. कारखानदारी बुडविणाऱ्यांसाठी मोदींच्या सभा आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. 

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ नातेपुते (ता. माळशिरस) येथील पालखी मैदानावर पवार यांची जाहीर सभा झाली. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मोदी यांच्या सभेनंतर पवार काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. तसेच, मोहिते पाटील यांच्या भाजपप्रवेशानंतर प्रथमच पवार तालुक्‍यात आले होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजयसिंह मोहिते पाटील यांना सरपंचपदापासून उपमुख्यमंत्रिपदा पर्यंत सर्व पदे दिली. सातत्याने अनेकांचा विरोध पत्करून संधी दिली. एवढे सगळे केल्यानंतर कृष्णा-भीमा स्थिरीकरण एवढ्या काळात कसे काय डोसक्‍यात आले नाही. "अंदर का मामला' दुसराच आहे, अशीही टीका त्यांनी केली. 

पवार म्हणाले, "संजय शिंदे यांच्यासारख्या सहकार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तीला पक्षाने संधी दिली आहे. जुन्या सहकाऱ्यांबद्दल मी वाईट बोलत नसतो. माझी चूक झाली, मी मोहिते पाटील यांना राजकारणात मदत केली. त्यांनी सामान्यांमध्ये परिवर्तन न करता सहकार संपविला.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wish PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Latest Marathi News Updates : हिमाचल आपत्तीवर भाजप खासदार कंगना राणौत यांचे विधान

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

SCROLL FOR NEXT