Ajit Pawar vs Jayant Patil Miraj NCP Melava esakal
पश्चिम महाराष्ट्र

NCP Crisis : 'करेक्ट कार्यक्रम व्हायचा नसेल तर दादांकडं या'; जयंत पाटलांवर निशाणा साधत कोणी दिला इशारा?

कुणाचाही कार्यक्रम करतो असे म्हणणारे अजितदादा नाहीत. त्यांच्याभोवती चांडाळ चौकडी जमू शकत नाही.

सकाळ डिजिटल टीम

२३ वर्षांपासून राष्ट्रवादीचा एकनिष्ठपणे काम केले. मात्र मी ज्यांचा पक्षात प्रवेश घडवला, अशा माझ्या नंतर आलेल्या लोकांना माझ्या अगोदर संधी देण्यात आली.

Miraj News : राज्याचा कारभार धमक असणाऱ्या नेत्यावरच चालतो. ते म्हणजे अजित दादाच (Ajit Pawar), तर काहींकडून नुसते करेक्ट कार्यक्रमच केले गेले. तर इतरांचा करेक्ट कार्यक्रम व्हायचा नसेल तर अजित दादांची साथ केंव्हाही बरीच, अशी टीका माजी मंत्री जयंत पाटलांवर (Jayant Patil) नाव न घेता विठ्ठल पाटील यांनी केली.

तर, माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी दादांनी घेतलेल्या निर्णयानंतर क्षणाचा ही विलंब न लावता दादा गटात सामील होणार असल्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा पार पडला.

यावेळी नगरसेवक अतहर नायकवडी, नगरसेवक योगेंद्र थोरात, कवठेपिरानचे माजी सरपंच भीमराव माने, साजिद पठाण उपस्थित होते.

वारकरी साहित्य परिषदेचे राज्य अध्यक्ष तथा दादा गटाचे नेते विठ्ठल काकाजी पुढे म्हणाले, 'सहकार, शिक्षण, शेती अशा सर्वच क्षेत्रांमध्ये अजितदादां एवढा जाणता नेता राज्यात नाही. वारकरी संप्रदायाचे प्रश्न अजितदादाच सोडवू शकतात. कुणाचाही कार्यक्रम करतो असे म्हणणारे अजितदादा नाहीत. त्यांच्याभोवती चांडाळ चौकडी जमू शकत नाही.'

इद्रिस नाईकवडी म्हणाले, मी राजाराम बापूंच्या कुशीत घडलेला कार्यकर्ता आहे. कुणाच्या नकारात्मकतेवर माझा राजकीय संसार मांडलेला नाही. मनात कोणता तरी "कार्यक्रम" ठेवून न वागणाऱ्या महान नेत्याच्या हाताखाली तयार झालो आहे. मला आव्हान देता येईल, मात्र माझा "कार्यक्रम" करणं सोपं नाही.

नगरसेवक योगेंद्र थोरात म्हणाले, २३ वर्षांपासून राष्ट्रवादीचा एकनिष्ठपणे काम केले. मात्र मी ज्यांचा पक्षात प्रवेश घडवला, अशा माझ्या नंतर आलेल्या लोकांना माझ्या अगोदर संधी देण्यात आली. यावेळी भीमराव माने यांनीही मनोगत व्यक्त केले.

नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य संपर्कात

मनपा क्षेत्रातील १० नगरसेवक आणि १५ जिल्हा परिषद सदस्य संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात आश्चर्याचा धक्का बसेल असे चेहरे अजितदादांच्या व्यासपीठावर दिसतील, असेही नाईकवडी व पाटील यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

विद्यापीठाने काही घडलंच नाही हे सांगायला लावलं, अत्याचार प्रकरणावरून विद्यार्थीनींचे प्रशासनावर गंभीर आरोप

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT