udayanraje
udayanraje 
पश्चिम महाराष्ट्र

'राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजेंची अवहेलना'

सकाळवृत्तसेवा

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीत हीन वागणूक दिली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथील भेटीत आठ दिवसांनी या सांगून त्यांची अवहेलनाच केली. राष्ट्रवादी पक्ष म्हणजे इतर पक्षातून आलेले टोळकेच आहे. अनेक जण बंडखोरी करतात. उदयनराजेंनी स्वाभिमानी व्हावे आणि पुन्हा एकदा भाजपमध्ये यावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी केले. 

येथील शासकीय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी वार्तालाप करताना बोलत होते. डॉ. येळगावकर म्हणाले, ""उदयनराजेंना जो पक्ष हीन वागणूक देत आहे, तो सोडून त्यांनी पुन्हा भाजपमध्ये यावे. भाजपमध्ये असताना जेम्स लेनप्रकरणी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी विचारांची लढाई विचारांनी होईल, असे स्पष्ट केले होते, तरीही उदयनराजेंनी जेम्स लेनचे कारण देऊन भाजप सोडला. उदयनराजेंचा सन्मान राखण्याऐवजी पक्षाच्या नेत्यांकडून त्यांना हीन वागणूक मिळत आहे. आठ दिवसांनी या, असे छत्रपतींना सांगितले जाते. त्यांनी आता स्वाभिमान जागरूक करून राजकीय भूमिका जाहीर केली पाहिजे.''

छत्रपती घराण्याबद्दल नितांत प्रेम आहे. छत्रपती घराण्यासाठी आमदारकी घालवली आहे. त्या वेळी घडलेल्या घटनेनंतर मतदारसंघात मतदान सुरू असताना साडेबारा वाजता भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आदेशामुळे औंध सोडून मी साताऱ्याकडे धाव घेतली. त्यामुळे माझा अवघा 500 मतांनी पराभव झाला होता. त्यांच्यासाठी मी त्याग केला असून, एक पैशाचा फायदा मी घेतला नाही. त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक नेतेमंडळी उदयनराजेंचे मित्र आहेत. ते त्यांचा सन्मान राखतील. त्यामुळे त्यांनी पुन्हा भाजपमध्ये यावे, असे आवाहनही डॉ. येळगावकर यांनी केले. 

हलकटांना हाकला 
मी उदयनराजेंचा जवळचा मित्र आहे. त्यांच्या जवळ राहून एक पैशाचाही फायदा करून घेतला नाही. त्यामुळे मी बोलताना घाबरत नाही. उदयनराजेंनी त्यांच्याजवळ राहून फायदा घेणाऱ्या अशोक सावंतासारखी "हलकट' माणसे हाकलून द्यावीत. नको त्या मार्गावर नेऊन, वातावरण खराब करणारी ही माणसे आहेत, असा निशाणाही उदयनराजेंच्या काही कार्यकर्त्यांवर साधला. उदयनराजेंना मोठे व्हायचे असेल तर त्यांनी स्वत:च्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे, अनुभवी लोकांचे ऐकले पाहिजे, असा मित्रत्वाचा सल्लाही त्यांनी दिला. 

""उदयनराजेंचा सन्मान राखण्याऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांना हीन वागणूक मिळत आहे. आठ दिवसांनी या, असे छत्रपतींना सांगितले जाते!''- डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाने पाडलेलं हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार, पण कॅप्टन कमिन्स फटकेबाजीने मुंबईसमोर 174 धावांचं लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT