dilip patil 
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे दिलीपतात्यांचा "शुभ्र लूक'

सकाळवृत्तसेवा

सांगली ः राष्ट्रवादीचे प्रदेश जनरल सेक्रेटरी आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी नुकतेच दोन फोटो फेसबूक पेजवर अपलोड केलेत.

त्यात तात्यांची दाढी चांगलीच वाढल्याचे दिसते आहे आणि ती शुभ्र पांढरी झालीय. "अभी तो मैं जवान हूँ' म्हणणाऱ्या तात्यांचा हा "शुभ्र लूक' पाहून अनेकांनी त्यांना फोन केलेत. पण, तात्या म्हणाले, ""एकवेळ पांढरी दाढी दिसली तरी चालेल, पण दाढी करायला बोलावून कोरोनाची भिती का बाळगा.''


दिलीततात्या मूळ वाळव्याचे. मुक्काम असतो इस्लामपूरात. ते लोकनेते राजारामबापू पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते होते आणि आता पालकमंत्री जयंत पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. गेल्या पाच वर्षांपासून ते जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहेच, शिवाय इस्लामपूर शहर आणि वाळवा तालुका हॉटस्पॉट आहेत.

त्यामुळे दिलीपतात्यांनी दाढी करण्यापेक्षा ती वाढलेली बरी, अशी भूमिका घेतली आहे. मध्यप्रदेशात केशकर्तन करायला गेले आणि कोरोनाबाधित झाले, असे नऊ लोकांबाबत घडले आहे. त्यामुळे मी आपला दाढीच न करण्याचा निर्णय घेतला, असे तात्या सांगतात. ते म्हणाले, ""मी वीस वर्षांपूर्वी स्वतःच्या हाताने दाढी केली होती. त्यानंतर दाढी कोरून घ्यायला लागलो. आता काहीच करता यायचे नाही.''


गंमत म्हणजे, इस्लामपूरच्या राजकीय मैदानात सन 2014 साली वाढलेली दाढी प्रकरण चांगलेच गाजले होते. जयंतरावांचे एकेकाळचे कट्टर विरोधक माजी खासदार राजू शेट्टी हे नेहमी दाढी वाढवून असतात. त्याबाबत जयंतरावांनी "दाढीवाल्यांचा भरवसा नाही', असे विधान केल्यानंतर जोरात रान उठले होते.

ते शांत करायला काही महिन्यांनी जयंतराव स्वतः दाढी वाढवून फिरत होते. त्यामुळे इस्लामपूर आणि दाढीचे राजकारण हा काही नवा विषय नाही. पण, दिलीपतात्यांची वाढलेली पांढरी शुभ्र दाढी त्यांच्या आवडत्या "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया', या गाण्याला साजेशीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

Pune Crime : ‘एनएचएम’ मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोटयावधींचा गंडा; नोकरीत कायम करण्‍याच्‍या नावाखाली उकळले ७५ कोटी

Pakistan admits: मोठी बातमी! अखेर पाकिस्तानला कबूल करावंच लागलं ; 'अमेरिकेच्या मध्यस्थीसाठी कधीच तयार नव्हता भारत'

SCROLL FOR NEXT