पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटक लगतच्या महाराष्ट्रातील नागरिकांना सोडा

तीन दिवसात निर्णय न झाल्यास कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी वाहने अडविण्यात येतील.

अनिल पाटील

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदीजवळ कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटक सीमेजवळ असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांना सोडण्याची मागणी कागलमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली. सीमा तपासणी नाक्यावरील अधिकारी यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. बुधवारी (४) मोर्चाद्वारे येऊन मागणीच्या पूर्ततेसाठी तीन दिवसांची वेळ देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भैय्या माने म्हणाले, 'कर्नाटकालगत असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याचा निम्मा भाग हा कर्नाटकाशी संलग्न असून त्यांना कर्नाटकातून जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. यासाठी येथील तपासणी नाक्यावरून गडहिंग्लज, आजरा, चंदगड, उत्तूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना कोगनोळी कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन सोडावे. येत्या तीन दिवसात निर्णय न झाल्यास कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी वाहने अडवण्यात येतील.

सीमा तपासणी नाक्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यावेळी कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, अमर चंदनशिवे, कागल तालुका पंचायत सभापती रमेश तोडकर, संजय चितारी, संजय ठाणेकर, सौरभ पाटील, अर्जुन नाईक, बच्चन कांबळे, आनंदा पसारे, सतीश घाडगे, सुनील माळी, सागर गुरव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक, युवक मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : मराठ्यांनो, १५ तारखेला मी एकटाच मुंबईला जातोय, आता मला कोण आडवतोय ते बघतोच, मनोज जरांगे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT