The need to increase the capacity of Miraj Kovid Hospital 
पश्चिम महाराष्ट्र

मिरज कोविड रुग्णालयाची क्षमता वाढवण्याची गरज 

प्रमोद जेरे

मिरज : जिल्ह्याचे एकमेव शासकीय कोविड रुग्णालय असलेल्या मिरज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयाची तातडीने क्षमता वाढवण्याची गरज आहे. एकावेळी सध्या केवळ दोनशे रुग्णांवर उपचार करण्यात येत असले तरी रुग्णांची वाढती संख्या आणि शासकीय रुग्णालयातील उपलब्ध खाटा आणि यंत्रणा पाहता या रुग्णालयाची क्षमता वाढविण्यासह जादा कर्मचाऱ्यांचीही संख्या तातडीने वाढविण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागणार आहेत. 

सांगली जिल्ह्याचे कोविड रुग्णालय म्हणून मिरज शासकीय रुग्णालयात 1 मार्चपासून कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू झाले. सध्या या रुग्णालयात एकावेळी दोनशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तेवढ्या रुग्णांसाठीची यंत्रणा सध्या या रुग्णालयात कार्यरत आहे. या रुग्णांना ऑक्‍सिजन, औषधे आणि जेवण हे मोफत दिले जाते. बहुसंख्य कोरोनाग्रस्त रुग्णांना गृहविलगीकरणाचा सल्ला दिला जात असला तरी आधिक त्रास होणाऱ्या रुग्णांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठविले जाते. या रुग्णालयात चांगले उपचार होत असल्याचा लौकिक असल्याने आणि खासगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च बहसंख्य रुग्णांना पेलवत नसल्याने आधिकाधिक रुग्ण मिरज शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी येतात. 

सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालल्याने या रुग्णालयावरील ताण दिवसागणिक वाढतो आहे. सध्या रुग्णालयात दोनशे खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. आणखी शंभर खाटांवर शंभर रुग्णांची सोय या रुग्णालयात होऊ शकते. यासाठी रुग्णालयात विविध ठिकाणी सध्या काम सुरु असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्या कामाला म्हणावा तसा वेग नाही. हे काम पुर्ण होऊन तेथे रूग्ण नव्याने दाखल झाले तरी त्यांच्यासाठीही ऑक्‍सिजन, औषधे आणि जेवणाची व्यवस्था रुग्णालय प्रशासनाकडुन होऊ शकते. परंतु याच अतिरिक्त रुग्णांसाठी आवश्‍यक सफाई कर्मचारी, परिचारीका आणि परिचारक रुग्णालयाकडे उपलब्ध नाहीत. 

रुग्णालय प्रशासनाने आरोग्य संचनालयाकडे प्रस्ताव पाठवले तरी त्याबाबत निर्णय हा खासगी ठेकेदार नियुक्त करून त्याच्यावर ही जबाबदारी निश्‍चित करण्याचे सरकारचे धोरण आहे. या खासगीकरणातील ठेकेदाराकडुनही नियुक्त केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अपुरा पगार, गैरसोयी यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने याचाही परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. 

कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर प्रचंड अन्याय होतो आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने या रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. अन्यथा रुग्णसेवेवर याचा प्रतिकूल परिणाम अटळ आहे. 
- संजय व्हनमाने सचिव, राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ पुणे विभाग.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT