Negative report of the father of that Corona Patient in Shrirampur 
पश्चिम महाराष्ट्र

श्रीरामपूरच्या त्या बाधिताची प्रकृती खालावली, मात्र वडिलांचा अहवाल निगेटीव्ह

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोनाबाधीत रुग्णाच्या थेट संपर्कात त्यांचे कुटुंबीय आले आहे. मात्र, त्याचा वडिलांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यांच्यासह कोरोंटाईन केलेल्या इतर 21 जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही. ते आज उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. दरम्यान,  त्या तरूण रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला इतर आजाराने ग्रासले आहे. आजारामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे, असे म्हणता येणार नाही, असे वैद्यकीय सुत्रांचे म्हणणे आहे.

तालुक्यातील गोवर्धनपूर येथील 27 वर्षीय मतीमंद तरूणास कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. महसूल, आरोग्य व पोलिस प्रशासनाने या गावासह परिसरातील दोन गावे सील केली.

घराघरात जावून तपासणी सुरु केली. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या दोघा डाॅक्टरांसह 21 जणांना कोरोंटाईन करून त्यांना नगर येथे हलविण्यात आले. त्यांच्या घशातील स्त्राव पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आज उशिरापर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.

आज सकाळी या 21 जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याचे सोशल मीडियावरून व्हायरल झाले. परंतू अहवाल अद्याप प्राप्त झालेले नसून ते सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. वसंत जमधडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पुणे येथे चौकशी केली असता त्याच्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ही बाब समाधानकारक आहे. त्याचे वडिल नेहमी संपर्कात असताना त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने इतरांचाही अहवाल तसाच येण्याची शक्यता डाॅ. जमधडे यांनी वर्तविली.

इतर आजारांनी ग्रासले

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. असे असले तरी तो विकलांग व मतिमंद असून त्याला दमा, रक्तदाब व इतर आजारानेही ग्रासले आहे. या आजारामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यामुळे कोरोनामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे, असे म्हणता येणार नाही, इतर आजारामुळेही प्रकृती खालवलेली असू शकते, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे डाॅ. जमधडे म्हणाले.

वैद्यकीय सुत्रांची माहिती अधिकृत असल्याने सोशल मिडीयावरून प्रसारित होणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, कोणीही अशा प्रकारचे मेसेज व्हायरल करू नये, लोकांनी घरी थांबून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मध्ये घेऊन गेलेल्या 'महादेवी'ला परत आणण्यासाठी ताकदीने लढा; मुनिश्री आदित्यसागर यांचे राजू शेट्टी, प्रतीक पाटलांना आवाहन

Explained: तुम्हालाही जास्त अक्रोड खाण्याची सवय आहे का? मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

Latest Marathi News Updates : थेऊरमध्ये 50 घरांत शिरलं पाणी, घटनास्थळी एनडीआरएफ पथक दाखल

Showroom fire: 'साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन्‌ बजाज शोरूमला भीषण आग'; धूर पाहून वॉचमनने दाखविली तत्परता, अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT