New illness in Ahmadnagar
New illness in Ahmadnagar 
पश्चिम महाराष्ट्र

नगरकरांमागे नवंच दुखणं, कोरोनापाठोपाठ आली सारी, १२ रूग्ण आढळले

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात एकीककडे काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी प्रशासन मेटाकुटीस आले आहे. मात्र, दुसरीकडे सारी हे नवेच झंगट आले आहे. दिवसेंदिवस त्याचे रूग्ण वाढत आहेत. सिव्हीअरली रेक्युट रेस्पायरेटी इलनेस म्हणजे सारी असे वैद्यकीय भाषेत म्हटले जाते. एक संकट निस्तरताना हे सारी नावाचे संकट ठाकल्याने सर्वसामान्य लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कारण या साथीचे बारा रूग्ण आहेत, जिल्हा रुग्णायालयानेच ही माहिती दिली.

जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या २८ झाली आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण बरे झाल्याने त्यांना घरी साेडून देण्यात आले.एकूण 23 जणांवर उपचार सुरू आहेत. काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी व काेराेनाची लागण झालेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी आराेग्य यंत्रणा व्यस्त असतानाच आता सारीचे रूग्ण आढळले आहेत. काेराेनाबराेबरच आराेग्य विभागाला सारीच्या रुग्णांकडे लक्ष द्यावे लागत आहे.
जिल्ह्यात एकूण १२ रूग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

ही आहेत सारीची लक्षणे
सर्दी, ताप, खोकला येतो. त्याला श्वास घ्यायला त्रास होतो.ही सारी आजाराची लक्षणे आहेत. नेमकी कोरोनाचीही हीच लक्षणे आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये संभ्रम आहे. नेमकी ही साथ कशामुळे पसरली. त्याची सुरूवात कोठून झाली. या रोगाची लक्षणे दिसली तर ती किती घातक असतात,याबाबत वैद्यकीय सूत्रांकडूनही स्पष्टपणे सांगितले जात नाही. जिल्ह्यात जे बारा रूग्ण आहेत ते नेमकी त्यांना कोठून लागण झाली, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT