Book
Book 
पश्चिम महाराष्ट्र

दुसरी आणि अकरावीला आता नवा अभ्यासक्रम

सकाळवृत्तसेवा

सातारा - येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. मात्र, तिसरीचा अभ्यासक्रम यंदा बदलण्यात येणार नसल्याचे ‘बालभारती’ने जाहीर केले आहे. 

पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम ठरविण्यासाठी एकच अभ्यास मंडळ तयार केले असून, या मंडळामार्फत अभ्यासक्रम बदलण्यात येत आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षी (२०१७-१८) सातवी व नववीचा; तर यंदा (२०१८-१९) पहिली, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलला होता. एक फेब्रुवारी २०१८ च्या पत्रान्वये राज्यात जून २०१९ या नव्याने सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ‘बालभारती’ने त्यात बदल करीत १७ जानेवारीच्या पत्रान्वये केवळ दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून तिसरीचा नवा अभ्यासक्रम येणार नाही. एखाद्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्याची सूचना शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच द्यावी लागते. गेल्या वर्षी तिसरीच्या अभ्यासक्रमातही बदल करणे प्रस्तावित केले होते. मात्र, बालभारतीने आता या निर्णयान्वये तिसरीचा अभ्यासक्रम न बदलण्याचे ठरविले आहे. त्यामुळे यंदा फक्त दुसरीचा अभ्यासक्रम बदलेल. मात्र, तिसरीचा अभ्यासक्रम कधी बदलणार, याबाबत स्पष्ट संकेत नाहीत.

जुना स्टॉक जमा करणार
राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती केंद्राकडून पाठ्यपुस्तक विक्रेत्यांना पत्र लिहून जुनी पुस्तके बदण्याची विनंती केली होती. यात दुसरी व अकरावीच्या पुस्तकांसाठी २०१८-१९ हे शेवटचे वर्ष असेल. पुढील वर्षी या इयत्तांची नवी पुस्तके बाजारात येतील. त्यामुळे जुना स्टॉक ‘बालभारती’कडे जमा करण्याच्या सूचनाही वितरक व दुकानदारांना दिल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT