New tenders forbidden in old works of the corporation
New tenders forbidden in old works of the corporation 
पश्चिम महाराष्ट्र

पालिकांच्या वाढीव नव्या कामांना जुन्या निविदात मनाई

सचिन शिंदे

कऱ्हाड - पालिकांच्या जुन्या निवीदात नव्यासह वाढीव कामांचा समावेश करून त्याचा कार्यादेश काढणाऱ्या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. अनेकदा निविदा प्रसिद्ध किंवा ती मंजूर झाल्यानंतर किंवा त्या निविदेचा कार्यादेश मिळाल्यानंतर त्यात नवीन किंवा वाढीव कामे घातली जातात. मात्र त्यामुळे त्या कामांना गती मिळत नाही. तांत्रिक अनियमीतता दिसून येते. त्या सगल्याला आळा बसावा, यासाठी वाढीव कामांसह नविन कामे जुन्या निविदात घालण्यास शासनाने मनाई तर केली आहेच. तसे केलेले आढळल्यास संबधित अधिकारी, कर्मचारी यांना शिस्तभंगाच्या कारवाईशी सामना करावा लागणार आहे. या निर्णयामळे निविदा मंजूर झाल्यानंतर काहीतरी हेतू ठेवून समाविष्ठ होणाऱ्या नव्या कांमावर अंकुश राहणार आहे. 

पालिकांमधून काहीही कारण सांगून होणाऱ्या जुन्याच कामांच्या निविदात नव्या कामांना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. पालिकांच्या कामातील तांत्रिक अनियमीतता टाळण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शासनाने लोकलेखा समितीचा अहवाल मिळाला आहे. त्या अहवालात निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर किंवा त्या निविदेचा कार्यादेश दिल्यानंतर त्यात प्रशासकीय किंवा तांत्रिक मान्यता नसलेली कामे समाविष्ठ केली जातात. त्यामुळे त्या कांमाना तांत्रिक अनियमीतता होत आहे. ती बाब गंभीर आहे. त्यामुळे शासनाने जुन्या निविदांत समाविष्ठ होणारी नवी कामे किंवा वाढीव कामे न घेण्याचा स्पष्ट आदेश दिले आहेत. ते आदेश न पाळणाऱ्या पालिकांतील संबधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई होणार आहे. त्यामुळे जुन्या निवीदात रेटून टाकली जाणारी वाढीव कामे किंवा नविन कामे नियंत्रणात राहणार आहेत. पालिका स्तरावर जुन्या निवीदात नवी कामे किंवा वाढीव कामे करण्याचे ठराव केले जातात. त्याला शासनाकडून मंजूरी घेतली जातेच. मात्र त्याचा कार्यादेश आधीच काढलेला असतो. त्यामुळे शासनाची परवानगी औपचारीतकता म्हणून राहत होती. आता ती स्थिती बदलणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार राज्य शासनाने जुन्या निविदात नवी कामे किंवा वाढीव कामे करू नयेत, असे स्पष्ट केले आहे. 

महत्वाचे निर्णय -
* कोणत्याही प्रकल्पात वाढीव काम देण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांचा प्रशासकीय व तांत्रिक अहवाल घ्यावा.
* मुळ प्रशासकीय मंजूर निविदात तांत्रिक मंजूरीच्या कामचाच समावेश करण्याची दक्षात घ्यावी.
* सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता असल्याशिवाय निविदा प्रसिद्ध करू नका.
* केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानेच निवीदा काढाव्यात. 
* निविदा प्रक्रीयेत समाविष्ट कामाव्यतिरिक्त अन्या कामांचा समावेश करू नका. 
* निविदा प्रक्रीया व कार्यादेश देणे या दरम्यान वित्तीय औचित्याच्या तत्वाचे पालन करावे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT