पश्चिम महाराष्ट्र

रात्री 'रिक्षाची रुग्णवाहिका' करणार्या अवलियाची इंडिया बुकने घेतली दखल...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - दिवसभर खासगी कंपनीत काम करून रात्री रिक्षाचा वापर रुग्णवाहिकेप्रमाणे करत गरजूंना मदत करणारे मंजुनाथ पुजारी यांच्या कामाची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. या कार्यातून त्यांच्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. ‘रात्रीचा रुग्णवाहक’ असा त्यांचा गौरव केला आहे. तीन वर्षात रात्रीच्या वेळेस १५० रुग्णांना मदत करत ४० हून अधिक जणांचे प्राण वाचविले आहेत.

ऑटोरिक्षालाच त्यांनी गरजूंसाठी रुग्णवाहिका केली

मंजुनाथ पुजारी हे येथील आयएल ॲन्ड एफएस ग्रुप ऑफ कंपनीमध्ये ऑफिस असिस्टंट म्हणून काम करतात. दिवसभर कंपनीमध्ये काम करून रात्री ते रुग्णवाहकाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या ऑटोरिक्षालाच त्यांनी गरजूंसाठी रुग्णवाहिका केली असून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता ही सेवा ते मागील तीन वर्षापासून करत आले आहेत.

सायंकाळी सहा ते सकाळी नऊ यावेळेत त्यांच्याशी कोणीही या सेवेसाठी मागणी केल्यास ते रुग्णाकडे पोचतात. रात्री रुग्णाच्या आपत्कालीन स्थितीत त्यांच्याशी संपर्क साधल्यास आपल्या रिक्षावजा रुग्णवाहिकेला घेऊन ते रुग्णाकडे पोचतात. त्यांच्या कामाची हीच दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. रात्रभर रुग्णवाहकाचे काम करणारे मंजुनाथ दिवसा मात्र आपल्या संसाराचा गाढा चालविल्यासाठी कंपनीमध्ये काम करतात. त्यांचे हे कार्य इतरांनाही प्रेरणादायी ठरणारे आहे.

शेजारी राहणाऱ्या गर्भवती महिलेला रात्रीच्या वेळेस रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेने आपल्याला प्रेरित केले. यातूनच आपण रिक्षाचा वापर रुग्णसेवेप्रमाणे करण्याचे ठरविले. .
- मंजूनाथ पुजारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT