Nikam couple saved the life of five thousands of snakes sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

26 वर्षांत 'या' दाम्पत्याने दिले पाच हजारांहून अधिक सापांना जीवदान 

विजय लोहार

नेर्ले (सांगली) : वाळवा तालुक्‍यातील भाटवाडी हे गाव अगदी थोड्याच लोकसंख्येच्या, गावांमध्ये सर्पमित्र गणेश निकम आणि त्याची पत्नी मीनाक्षी निकम हे दोघेही परिसरात सर्पमित्र म्हणून काम करतात. मागील 26 वर्षांत या दाम्पत्याने तब्बल पाच हजारांहून अधिक जास्त सापांना पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून त्यांना जीवदान दिले आहे. 

मीनाक्षी या घरकाम करतात, तर गणेश हे गवंडी काम. दोघेही सर्प पकडण्यात पटाईत आहेत. गणेश यांना इयत्ता पाचवीपासून सर्पप्रेमाची गोडी लागली. आई-वडील भक्तीमार्गात असल्यामुळे त्यांना भूतदया होती. आपल्याला भरपूर शिकायला मिळालं. मुंबई येथील संजय गांधी उद्यानशेजारी राहायला असल्यामुळे तेथील प्राणी संग्रहालयात जाण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे लहानपणापासूनच सापांविषयी ओढ होती. शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सापाकडे बघितले गेले पाहिजे. लोकांचे अन्न वाचवण्याचं काम सर्प करत असतात. परिसरातील घोनस, नाग, मण्यार, धामण, अशा अनेक विषारी साप व बिनविषारी सापदेखील त्यांनी पकडून निसर्गाच्या सान्निध्यात त्यांनी सोडून दिले आहेत. हे काम ते नि:शुल्क करत असतात. 

अगदी चपळाईने साप हाताळणे व न घाबरता त्यांची देखभाल करण्याचे काम मीनाक्षी कौशल्याने करतात. अनेक जखमी सापांवर मीनाक्षी यांनी उपचार केले आहेत. सापांबरोबरच माकड, उदमांजर, पक्षी यांचीही त्यांनी सेवा केली आहे. निसर्गातील प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार, असे त्या सांगतात. या दाम्पत्याने शेततळी, विहीर, शेत, घरे आदी ठिकाणचे सर्प पकडून त्यांनी अनेक कुटुंबांना दिलासा दिला आहे. नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे महाराष्ट्रात सापडणारे विषारी साप आहेत. तसेच तस्कर, कुकरी, कवड्या, दिवड, नानेटी खापर, खवल्या, वाळा, मांडूळ, गवत्या धामण, धूळ नागीन, दुर्क्‍या असे बिनविषारी सर्प परिसरात असल्याचे त्यांनी सांगितले. 

सापांना मारू नका 
सर्प दिसताच त्याला मारू नका. जवळील सर्पमित्र किंवा वनविभागाला कळवा. ते पकडून नैसर्गिक अधिवासात सोडतील. लाखो टन अन्न वाया घालवणाऱ्या उंदीर व कीटकांना साप खातात. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतच होते. आधार अनिमल रिस्पेक्‍ट टीमदेखील सक्रिय असते. संपर्क:- 9284123136 
Associated Media Ids : NER21B01270, NER21B01271 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT