Nipani marathi Literature Conference coming soon nipani marathi news  
पश्चिम महाराष्ट्र

आता निपाणीच्या साहित्य संमेलनाकडे लागले डोळे...

अशोक परीट

निपाणी (बेळगाव) - निपाणी भाग मराठी साहित्य रसिक मंडळातर्फे आयोजित मराठी साहित्य संमेलन ऐनवेळीपुढे ढकलल्याने रसिकांचा विरस झाला, मात्र मराठी भाषिकांकडे खूपच संयम आहे. वातावरण निवळत असल्याने संमेलनाच्या तारखेकडे डोळे लागले आहेत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर

सीमाभागात मराठी आणि कन्नड या भाषाभगिनी सौहार्दाने नांदतात, ही वस्तुस्थिती आहे. सीमाप्रश्‍न न्यायप्रविष्ट असताना सर्व भाषिक नागरिकांत बंधुभाव, शांतता व संयम कायम आहे. रसिक-श्रोत्यांच्या उदंड उत्साहात ठिकठिकाणी साहित्य संमेलने होत आहेत. निपाणी भाग मराठी साहित्य रसिक मंडळानेही दुसऱ्या संमेलनाची तयारी पूर्णत्वाला आणली होती, पण पोलिस व जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणल्याने तारीख पुढे ढकलावी लागली.

संयोजकांची जिद्द कायम

निपाणीत दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य परिषदेची २ तर अन्य छोटी-मोठी अनेक संमेलने शांततेत झाली आहेत. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांनी येऊन व्याख्याने दिली आहेत. मराठी नाटकांचेही अनेक प्रयोग झाले आहेत. असे असताना संमेलनावर निर्बंध लादणे हा प्रशासनाचा आदेश चिंता वाढविणारा आहे. त्यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दाही ऐरणीवर आला. संमेलन केव्हा होणार, याकडे नजरा लागल्या आहेत.

साहित्य रसिकांच्या जिव्हारी बाण

साहित्य संमेलनाच्या नथीतून वेध घेत प्रशासनाने सोडलेला बाण मराठी भाषिकांच्या आणि साहित्यप्रेमींच्या जिव्हारी लागला आहे. पुन्हा उभारी घेऊन संमेलन यशस्वी करण्याची जिद्द संयोजकांत स्पष्ट जाणवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

SCROLL FOR NEXT