निपाणी तालुका बंद sakal
पश्चिम महाराष्ट्र

शेतकरी कायद्याच्या विरोधात उद्या निपाणी तालुका बंद

तालुका रयत संघटनेची बैठक; संभाजी चौकात तहसीलदारांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

निपाणी : केंद्र सरकारने केलेल्या कायद्यामुळे देशातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याच्या विरोधात बऱ्याच महिन्यापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. तरीही त्याची केंद्र सरकारने दखल न घेतल्याने सोमवारी (ता.२७) भारत बंदची हाक शेतकरी संघटनेने दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे निपाणी तालुका बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांनी दिली. रविवारी (ता.२६) दुपारी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

राजू पोवार म्हणाले, केंद्र सरकारने शेतजमीन विक्री बाबत नवीन कायदा केला आहे.हा कायदा शेतकऱ्यांना जाचक ठरत असून भविष्यात शेतकरी भूमिहीन होणार आहे. याबाबत नवी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याशिवाय शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत लोटत जात आहेत.

कोरोना काळात शेतीमालाला दर न मिळाल्याने भाजीपाला पिके रस्त्यावर फेकून द्यावी लागली आहेत. या शिवाय महापूर काळातही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही. याउलट शेतकऱ्यांचे वीज बिल माफ न करता त्याची वसुली केली जात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा विविध मागण्यासाठी सोमवारी (ता.२७) निपाणी तालुका बंदची हाक दिली आहे. त्यामध्ये निपाणी शहर व परिसरातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. तेथे धर्मवीर संभाजी सर्कलमध्ये शेतकरी एकत्रित येऊन त्यांच्याकडून तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन रयत संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

प्रा. आय. एन. बेग यांनी, केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करून निपाणी तालुका बंदमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी नारायण पाटील, संदीप चौगुले, उमेश परीट, बाळासाहेब हादीकर, उमेश भारमल, अनंत पाटील, राजू पाटील, अल्लाउद्दीन शिरगुप्पे, विजय सावजी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT