पश्चिम महाराष्ट्र

#SSCL 'निर्मला'च्या आदित्य नलावडेने रचला इतिहास;आज उपांत्य फेरी

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूलचा भेदक गोलंदाज आदित्य नलावडेने प्रतिस्पर्धी अनंत इंग्लिश स्कूलच्या पाच फलंदाजांना शून्य धावांवर बाद करून सकाळ स्कूल क्रिकेट लीग स्पर्धेत इतिहास रचला. दरम्यान, महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या उर्जितसिंग पवार, राज जाधव, सौमित्र करचे, साहिल वाडते, अभिषेक कोळपे यांनी चतुरस्त्र खेळ करून इक्रा इंग्लिश मीडियम स्कूलवर तब्बल 50 धावांनी विजय मिळविला. शालेय क्रिकेटपटूंच्या दर्जेदार खेळाने क्रीडा रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांना दाद दिली. सातारा सातारा सातारा

ही स्पर्धा छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात येत आहे. महाराजा सयाजीराव विद्यालय आणि इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातील सामन्याची नाणेफेक "विठ्ठल मंगलम'चे संचालक मंगेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. "महाराजा सयाजीराव'च्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. "महाराजा सयाजीराव'च्या संघाच्या निर्धारित 20 षटकांत दोन बाद 128 धावा झाल्या. त्यामध्ये उर्जितसिंग पवार आणि राज जाधव यांची 121 धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. विजयासाठीचे 129 धावांचे आव्हान इक्रा इंग्लिश स्कूलला पेलले नाही. त्यांचा डाव 16.5 षटकांत 78 धावांत संपला. "महाराजा सयाजीराव'च्या संघातील उर्जितसिंग पवारला आर्या प्रॉपर्टीजचे अमर बेंद्रे, शिवदत्त डेव्हलपर्सचे किरण कदम यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला. 

संक्षिप्त धावफलक ः 
महाराजा सयाजीराव विद्यालय ः 20-2-128. उर्जितसिंग पवार नाबाद 43 (54 चेंडूत 2 चौकार), राज जाधव 56 (54 चेंडूत 7 चौकार), सईद बागवान 4-29-1. वि. वि. इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल ः 16.5-10-78. सईद बागवान 18 (27 चेंडूत 2 चौकार), अथर्व काटेकर 15 (22 चेंडूत 1 चौकार), सौमित्र करचे 3-12-3, साहिल वाडते 3.5-13-2, अभिषेक कोळपे 4-20-2, उर्जितसिंग पवार 3-7-2. 

Video : प्रेमीयुगलास मारहाण योग्य नव्हे : रिंकू राजगूरु


 

"निर्मला'चा मोठा विजय 


दरम्यान, निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल आणि अनंत इंग्लिश स्कूल हा सामना एकतर्फी झाला. या सामन्याची नाणेफेक पालेकर फुड्‌सचे प्रणव पालेकर यांच्या हस्ते करण्यात आली. "निर्मला'ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. अनंत इंग्लिश स्कूलच्या सलामीच्या जोडीस पार्थ जाधवने संघाच्या अवघ्या 25 धावांत तंबूत धाडले. त्यानंतर यशराज घाडगेने तळ ठोकत "अनंत'ची धावसंख्या वाढविली. परंतु, त्यास अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. "निर्मला'च्या आदित्य नलावडेने शून्य धावांवर पाच गडी बाद केल्याने "अनंत'चा डाव 18.2 षटकांत 89 धावांत आटोपला. प्रत्युत्तरात "निर्मला'ने हा सामना 9 गडी राखून जिंकला. "निर्मला'च्या आदित्य नलावडे यास चंदुकाका सराफचे व्यवस्थापक सुहास भोसेकर आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. भास्कर यादव यांच्या हस्ते सामनावीरचे पारितोषिक देण्यात आले.
 
संक्षिप्त धावफलक ः अनंत इंग्लिश स्कूल 18.2 सर्वबाद 89. यशराज घाडगे 32 (47 चेंडूत 5 चौकार), चैतन्य साळुंखे 11 (19 चेंडूत 1 चौकार). आदित्य नलावडे 3.2-12 -5, पार्थ जाधव 4-18-2, वेदांत देवडे 4-15-1, अनिश शिरसाट 1-10-1 पराभूत विरुद्ध निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल 9-1-92. जैद शेख 9 (8 चेंडूत 2 चौकार), अनिश शिरसाट नाबाद 43 (33 चेंडूत 8 चौकार), अर्जुन वाघ नाबाद 19 (13 चेंडूत 4 चौकार), रवीकिरण तांदळे 2-18-1. 

#SSCL निर्मला कॉन्व्हेंट, शानभाग विद्यालय विजयी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL 2026 : जॅकलिनचा डान्स, हनी सिंगचा धमाका; हवा केली ‘त्या’ तरुणीने! कोण आहे Harnaaz Kaur Sandhu?

Municipal Election: भिवंडीचे राजकारण अडकलं बिगर-मराठी मतदारांच्या कौलात; शेवटच्या क्षणीही सस्पेन्स कायम!

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये ठाकरे बंधुंची संयुक्त सभा सुरू

Stray Dogs Issue: शिक्षकांना भटके कुत्रे पकडण्याचे आदेश; शिक्षण विभागाचे अजब फर्मान, सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Municipal Election 2026 : अमरावतीत प्रचाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न? अनिल बोंडेंच्या 'त्या' दाव्यानं राजकारण तापलं, संजय खोडकेंचंही प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT