No one is ready to talk about Shivaji Road 
पश्चिम महाराष्ट्र

शिवाजी रस्त्याबाबत कोणीच बोलायला तयार नाही

प्रमोद जेरे

मिरज : शहरातील मुख्य रस्ता असणाऱ्या शिवाजी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सातत्याने फसवणूक सुरू आहे. रत्नागिरी- नागपूर महामार्गाच्या ठेकेदाराकडेच हे काम देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम रखडले असूनही याबाबत कोणीच काही बोलायला तयार नाही. 

आमदार सुरेश खाडे हे या रस्त्याचे काम महिनाभरात काम सुरू होईल असे सांगत असले, तरी ना हे महिने सरले ना या रस्त्याचे नष्टचर्य. रस्ता दिवसेंदिवस बिघडतो आहे, अपघातही वाढत आहेत. प्रश्‍न आहे तो या रस्त्याचे घोंगडे आणखी किती दिवस भिजत पडणार आहे. 

गेल्या चार वर्षांपासून या रस्त्याचे रडगाणे सुरू आहे. या कालावधीत डझनाहून अधिक बळी घेऊन अनेकांना आयुष्याभराचे जायबंदी केले आहे. बऱ्याच द्राविडी प्राणायामानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाला आहे. या रस्त्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली अवजड वाहनांची वाहतूकही मोठी डोकेदुखी आहे. सध्या सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे या रस्त्यावरील अवजड वाहतुकीचा भार हलका होणार असला, तरी अन्य वाहतूक सुरूच राहणार आहे. गेल्या दहा वर्षांत या रस्त्यावर किमान शंभर कोटी रुपयांची उधळपट्टी झाली आहे. मात्र त्यात रस्त्याची उंची वाढण्यापलीकडे काहीच झाले नाही. 

या रस्त्याच्या हस्तांतरणानंतरही प्राधिकरण त्याच्या कामाबाबत गंभीर नाही. याचे काम महामार्ग ठेकेदाराकडेच सोपवण्यात आले असले, तरी हे काम नेमके कधी सुरू होऊन किती दिवसांत पूर्ण होणार याबाबतही कोणीही काही बोलत नाही. सामान्य माणसे दररोज खड्डयांमध्ये पडतात, जखमी होतात, काहींचा बळी जातो, काही बरी होतात पुन्हा कामाला लागतात, हेच चित्र कायम आहे. 

अधिकारी फोन उचलत नाहीत 
या रस्त्याचे काम ज्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे, त्या प्राधिकरणाचे कार्यालय सोलापूरला आहे. या रस्त्याबाबत कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ते फोनच उचलत नसल्याचा अनुभव प्रस्तुत प्रतिनिधीसह लोकप्रतिनिधींनाही आला आहे. 

रत्नागिरी नागपूर महामार्गाशी जोडलेल्या शिवाजी रोडची दुरुस्ती देखभाल महापालिका अथवा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागास करणे शक्‍य नाही. त्यासाठीच हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. अंदाजपत्रकातील तरतुदीपासून ते अन्य तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाले आहेत. हे काम त्वरित होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. 
- सुरेश खाडे, आमदार, मिरज 

मिरजेतील शिवाजी रोड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केला असला, तरी त्याच्या उपयोगितेचा थेट संबंध शहरातील नागरिकांशी आहे. यावर खर्च होणारा पैसा हा नागरिकांच्या खिशातील असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत लपवाछपवी करू नये. जबाबदारीने वागावे. 
- दिग्विजय सूर्यवंशी, महापौर, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT