पश्चिम महाराष्ट्र

आरोग्य केंद्रांना कुणी जागा देता का जागा... वाचा कुठल्या शहरातील स्थिती

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहरातील नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या हेतूने आता सोरेगाव, देगाव व अक्‍कलकोट रोड याठिकाणी नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरु केली जाणार आहेत. तर हद्दवाढ भागातील शेळगी, विडी घरकूल, जुळे सोलापूर या तीन ठिकाणी जागेचा शोध सुरु झाला आहे. नई जिंदगी येथील आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, विडी घरकूल, जुळे सोलापूर व निलमनगरात प्रसुती केंद्रे सुरु करण्याचेही नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. 

शहरातील महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता आरक्षण बदलून गिळंकृत केल्याचा आरोप सातत्याने होतो. काही नगरसेवकांनी त्याविरोधात महापालिकेच्या सभागृहात अनेकदा आवाजही उठविला. दुसरीकडे महापालिकेच्या जागांवरील वर्षानुवर्षांचे आरक्षण उठत नसल्याने त्या जागांवर आता मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाचा विळखा पडल्याचे चित्र आहे. परंतु, शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे व प्रसुती केंद्रे सुरु करण्यासाठी जागा मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. सात- आठ महिन्यांपूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रे व प्रसुती केंद्रांसाठी जागा उपलब्ध आहे का, याची विचारणा केली. मात्र, अद्याप त्याचे उत्तर आरोग्य विभागाला मिळालेले नाही. शहराचा विस्तार वाढत असतानाच हद्दवाढ भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढली. त्या भागातील नागरिकांना आता आरोग्याची सोयच उपलब्ध नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शेळगी, विडी घरकूल हा कामगार वस्ती असलेला भाग, तेथील नागरिकांचे हातावरील पोट आहे. त्यांना महापालिकेने आरोग्य सेवा उपलब्ध करुन न दिल्याने खासगी रुग्णालयातून उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. 

आरोग्य विभागाची शहरातील स्थिती 

  • प्राथमिक आरोग्य केंद्रे : 14 
  • दवाखाने : 10 
  • प्रसुती केंद्रे : 8 
  • पॉलिक्‍लिनिक हॉस्पिटल : 1 
  • संसर्गजन्य आजारांवरील रुग्णालय : 1 

ठळक बाबी... 

  • शहराची लोकसंख्या 11 लाखांहून अधिक असतानाही आरोग्य केंद्रे व रुग्णालयांची संख्या अपुरीच 
  • प्रसुती केंद्रांमधील गर्भवती महिलांची संख्या अन्‌ केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड 
  • डेंगी, चिकनगुनियासह अन्य आजारांच्या रुग्णांची दरवर्षी लक्षणीय संख्या : संसर्गजन्य रुग्णालय मात्र एकच 
  • हद्दवाढ भाग होऊन 23 वर्षांचा काळ लोटला : त्याठिकाणी महापालिकेचे आरोग्य केंद्र अथवा रुग्णालयही नाही 
  • नव्या प्रसुती केंद्रांसाठी केंद्र सरकारच्या धोरणांचा अडथळा : प्रस्ताव पाठविण्यासाठी नगरसेवकांना मिळेना वेळ 
  • महापालिकेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता धुळखात, अतिक्रमण वाढले : आरोग्य केंद्रांसाठी मात्र मिळेना जागा 

आरोग्य आयुक्‍तांमार्फत केंद्राला पाठवावा लागतो प्रस्ताव 
शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने शेळगी, विडी घरकूल, जुळे सोलापुरात नवे प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरु करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरु असून जागा उपलब्ध झाल्यास सर्वसाधारण सभेचा ठराव घेऊन तो प्रस्ताव आरोग्य विभागाच्या आयुक्‍तांना पाठविला जाणार आहे. त्यानंतर तो प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे. तेथून मंजुरी आल्यानंतर शहरात प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरु केली जाणार आहेत. 

महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT