Non coordination in police administration regarding trade in Miraj 
पश्चिम महाराष्ट्र

मिरजेत व्यापाराबाबत पोलिस-प्रशासनात बेबनाव

सकाळवृत्तसेवा

मिरज (जि  सांगली) : शहरातील व्यापारी सेवेबाबत पोलिस आणि प्रशासनात योग्य समन्वय नसल्याने त्याचा नाहक त्रास व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो आहे. व्यापार सुरू करण्यासाठी या दोन्ही यंत्रणानी योग्य निर्णय घेतले नाहीत, तर व्यापारी नाईलाजाने उघडपणे व्यापार सुरू करण्याच्या पवित्र्यात आहेत. 

मिरज शहरात प्रशासनाने विशिष्ट ठिकाणी व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु यामध्ये सर्वच प्रकारच्या व्यापाऱ्यांचा समावेश नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पंखे, कुलर, तसेच अन्य इलेक्‍ट्रिक साहित्यासह विविध प्रकारच्या उपकरणे आणि रमजान महिन्यानिमित्त लागणाऱ्या साहित्यासह अनेक प्रकारच्या साहित्याची दुकाने ही शहरात विविध ठिकाणी आहेत.

केवळ गर्दीचे रस्ते हा निकष लावून प्रशासनाने ही दुकाने उघडण्याबाबत मनाई केली असली, तरी हा निर्णय शास्त्रीय पद्धतीने घेतला नसल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. प्रत्येक वस्तूच्या व्यापाराचा विशिष्ट कालावधी असतो. या कालावधीत जर व्यापार बंद राहिला तर व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होते. सध्या मिरज शहरातील व्यापार सुरू करण्याबाबत पोलिस आणि प्रशासनात नेमक्‍या याच समन्वयाचा अभाव दिसतो आहे. 

शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ केवळ गर्दीचा धोक्‍यामुळे बंद ठेवण्याची प्रशासनाची भूमिका असेल तर दारू दुकानांसमोरील गर्दी आजही हटलेली नाही. याचाही प्रशासनाने विचार करावयास हवा. शहरातील अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या रस्त्यांवर आंबे आणि फळ विक्रेत्यांनी आपल्या पथाऱ्या पसरल्या आहेत. छोट्या गल्लीबोळात मोठी उलाढाल असणारी शेकडो दुकाने सुरू झाली आहेत, त्याकडे मात्र पोलिस आणि प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. परंतु जे व्यापारी सुरक्षित अंतर तसेच अन्य सर्व नियम निकष पाळून व्यापार करण्यास तयार आहेत. त्यांना मात्र विनाकारण प्रतिबंध केले जात आहे.

अनेकवेळा पोलिसही व्यापाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावून दमबाजी करत आहेत. वास्तविक व्यापाराचे अर्थचक्र सुरू राहिले नाही, तर भविष्यकाळात व्यापारी आणि त्यांच्याकडील कर्मचारी यांची स्थिती गंभीर होणार आहे. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि व्यापार त्वरित खुला करावा अशी मिरजेच्या मुख्य रस्त्यावरील व्यापाऱ्यांची मागणी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT