पश्चिम महाराष्ट्र

मटनाचे दर भिडले गगनाला

राजकुमार घाडगे

पंढरपूर : मटनाचे दर गगनाला भिडल्यामुळे येथील मांसाहारी खवय्यांची पंचाईत झाली आहे. कोल्हापूरमधील खवय्यांनी नुकतेच आंदोलन केल्याने तेथील मटन विक्रीचा दर 560 रुपयांवरून 480 रुपये प्रतिकिलो असा निश्‍चित केला आहे. त्याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातही प्रशासनाने मटनाचे दर निश्‍चित करावेत, अशी मागणी खवय्यांमधून होत आहे.

पंढरपूर शहर व परिसरात मटन विक्रीची सुमारे 25 ते 30 दुकाने आहेत. शहरातील मटन मार्केट, वाखरी रस्ता, टाकळी रस्ता, देगाव रस्ता, कासेगाव रस्ता या ठिकाणी मटनाची दुकाने आहेत. आठवड्यातील मंगळवार, बुधवार, शुक्रवार व रविवारी मटनाच्या दुकानात मांसाहारी खवय्यांची गर्दी दिसून येते. काही महिन्यांपूर्वी या दुकानांमधून एका किलोला 480 ते 500 रुपयांच्या दरम्यान मटन विक्री केली जात होती.

मागील पंधरवड्यात कोल्हापूरमध्ये मटनाचे दर वाढल्याने तेथील मांसाहार करणाऱ्या लोकांनी या भाववाढीविरोधात आंदोलन केले होते. तेव्हा तेथील जिल्हा प्रशासनाने मटन विक्रते व खवय्ये यांच्यामध्ये तोडगा काढत 480 रुपये प्रतिकिलो दर निश्‍चित केला आहे. त्याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातही प्रशासनाने मटनाचा दर ठरवून द्यावा, अशी मागणी खवय्यांमधून होत आहे. 

ब्रॉयलर चिकनला पसंती
मटन परवडत नसल्याने आम्ही नाइलाजास्तव 180 रुपये किलो असलेल्या ब्रॉयलर चिकन खाण्याला पसंती दिली आहे. 
- मारुती बिले, टाकळी, पंढरपूर 

ग्राहकांच्या गर्दीवर परिणाम
मटनाचे दर वाढल्याने आम्हा हॉटेल व्यावसायिकांनादेखील मटन डिशेसचे दर वाढवावे लागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या गर्दीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 
- उत्तम अभंगराव, हॉटेल व्यावसायिक, पंढरपूर 

महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

'सेटवर वर्चस्व दाखवलं जात होतं' अमृताने सांगितला 'तुमचं आमचं सेम असतं' मालिकेच्या सेटवरचा किस्सा, म्हणाली...'वजनावरुन मला नेहमी...'

Mahabaleshwar Ambenali Ghat Accident : आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ 800 फूट दरीत कोसळली; 6 मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचा 'हा' नवा थरारक प्लॅन, दोघांचे मृतदेह काढले बाहेर

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड; शून्यावर बाद होताच 'या' परदेशी खेळाडूची बरोबरी; नेमकं काय घडलं

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

SCROLL FOR NEXT