Sadabhau Khot and Devendra Fadnavis Sakal
पश्चिम महाराष्ट्र

शर्यतच नव्हे, खिलार वंश वाचला; सदाभाऊ खोत

बैलगाडी शर्यती सुरु व्हाव्यात, यासाठी सात वर्षांपासून कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई सुरु होती. ती अखेर जिंकली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सांगली - बैलगाडी शर्यती (Bullockcart race) सुरु व्हाव्यात, यासाठी सात वर्षांपासून कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई सुरु होती. ती अखेर जिंकली आहे. आता बळीराजाचा उत्सव पुन्हा सुरु होतोय आणि तो आनंददायी आहे. शर्यत नव्हे तर खिलार वंश वाचवणारा निर्णय आहे, अशा भावना आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी व्यक्त केली.

न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला सशर्त मान्यता दिल्यानंतर खोत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. त्यानंतर ते बोलत होते.

ते म्हणाले,‘‘बळीराजा, बैलगाडी मालक व चालकांच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्सवाचा एक मोठा विजय आहे. गेले सात वर्षे बैलगाड्या शर्यतीसाठी रस्त्यावरची आणि कायदेशीर लढाई सुरु होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सभागृहात कायदा केला. पशुतज्ञांची एक समिती नेमून कर्नाटक, तामिळनाडूत सुरु असलेल्या बैल उत्सवाचा अभ्यास केला. बैल हा जंगली नव्हे तर पाळीव प्राणी आहे आणि तो शर्यतीला पळणारा प्राणी आहे, अशा पद्धतीची चांगली मांडणी केली. त्या समितीने ती न्यायालयापुढे आणली. सर्वोच न्यायालयात तो अहवाल सादर झाला.’’

ते म्हणाले, ‘‘अनेकांनी त्यात पाठपुरावा केला. सध्याच्या सरकारनेही त्यात पाठपुरावा केला. राज्यातील जे खिलार पशुधन आहे, त्याची उपयुक्तता दुधासाठी नसून त्याच्या पोटी जन्माला येणारा खिलार बैल शेतात मशागत आणि शर्यतीसाठी आहे. अलिकडे शेतीचे यांत्रिकीकरण झाले आहे. परिणामी खिलारची उपयुक्तता संपत चालली होती. शर्यती बंद झाल्या असत्या तर खिलार गाय आणि खोंड नामषेश किंबहुना नष्ट झाली असती. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे वरदान असणारी ही जात नष्ट होणे हातून घात करण्यासारखे ठरले असते. त्यामुळे हा निकाल सर्वार्थाने महत्वाचा आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशाच्या राजकारणात मोठा बदल... विरोधकांना कमजोर समजणं NDAला पडलं महागात? दोन-तृतीयांश बहुमताचं स्वप्नाचं काय झालं?

Post Office Scheme: FD पेक्षा भारी ही पोस्टाची स्कीम? फक्त 1,000 रुपयांपासून गुंतवणूक अन् 7.5% व्याजदर? पाहा संपूर्ण गणित

Riddhi Thakkar: लेकीचा मृतदेह आणायला जन्मदात्याचा १००० किमी प्रवास, समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : नाशिक पुन्हा हादरलं! ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maratha Reservation: ‘माझी टिंगल करा, मला वाईट वाटणार नाही’; जरांगेंच्या टीकेला बावनकुळेंचा सडेतोड पलटवार, एकही दाखला रद्द केलेला नाही

SCROLL FOR NEXT