The number of Corona suspects increased in Ahmednagar 
पश्चिम महाराष्ट्र

नगरमध्ये कोरोना संशयितांची व्याप्ती वाढली, १२६जणांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा

नगर ः नगर जिल्ह्यात कोरोना संशयितांची व्याप्ती वाढली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे उपाय करण्यास सुरूवात केली आहे. गर्दी होऊ नये म्हणून कालपासून लॉकडाऊन केलं आहे. आतापर्यंत 126जणांची तपासणी केली आहे. त्यातील 72जणांना होम क्वॉरंटाईन केलं आहे. दोनजण पॉझिटीव्ह आढळले आहेत, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.

नगरमध्ये आज पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, की प्रत्येकाची स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. विनाकारण बाहेर फिरू नये. आपले हात वारंवार स्वच्छ धुवावेत. कोरोनाची ही दुसरी स्टेज आहे. तिसरी स्टेज येणारच नाही, यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू. आपले जिल्हाधिकारी व सर्वच अधिकारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. आपणही कुठंही ढिले पडू नका. गरीब वस्तीवरही लक्ष ठेवावे. हा जगावरच मोठा धोका आहे. त्याचे राैद्र रुप होऊ शकते. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे.

नागरिकांना भीतीचे कारण नाही. ही संयम राखण्याची वेळ आहे, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं.

जागतिक पातळीवर मिशन ठरेल
कोरोनाचे संकट हे जागतिक पातळीवर आहे. त्यामुळे आगामी काळात अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी जागतिक पातळीवर ठराविक मिशन ठरेल. अशा पद्धतीच्या संकटावर मात करण्यासाठी जगभरात पद्धती ठरून त्यावर मात करता येईल. देशपातळीवर पंतप्रधानांनी आवाहन केल्याप्रमाणे प्रत्येकाने हे युद्ध समजून सामना केला पाहिजे, असेही थोरात यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबई लोकलच्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! १८ डब्यांची लोकल लवकरच धावणार; चाचणी घेणार, पण कधी?

Vijay Hazare Trophy: संजू सॅमसन स्वस्तात बाद झाला, पण विष्णू विनोदनं ठोकले १४ सिक्स; ऋतुराज गायकवाडच्या पंक्तीत मिळवलं स्थान

JEE Exam Update: हाय कोर्टाचा अजब फतवा, जेईईच्या परिक्षेला बसायच्ं असेल तर वृद्धांची सेवा करा!

Stock Market Today : शेअर बाजार ‘लाल’ रंगात बंद; सेन्सेक्स 350 अंकांनी घसरला, Reliance ला मोठा झटका; पण ‘हे’ शेअर्स तेजीत

Thane Metro: ठाणे मेट्रो कधी सुरू होणार? प्रताप सरनाईकांनी 'ती' वेळच सांगितली! तारखेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT