3sparrow_0.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

चिऊताईंची संख्या दहा हजारांवर...

सकाळवृत्तसेवा

सांगली - तीनशेवर विद्यार्थी आपल्या परिसरात चिऊताई दिसते का पहात होते. कुठे गर्द झाडीत, तर कुठे टॉवरवर चिऊताई दिसायची. चिऊताई दिसल्यानंतर विद्यार्थ्यांचा उत्साह वाढायचा. तीनशेवर विद्यार्थ्यांना सुमारे दहा हजार चिऊताई दिसल्या. तशी नोंदही त्यांनी घेतली. निमित्त होते जागतिक चिमणी दिनानिमित्त आयोजित चिमणी गणनेचे. बर्ड सॉंग आणि खोपा बर्ड हाऊसतर्फे हा उपक्रम झाला.

एरवी चिऊताईचा चिवचिवाट सर्वत्र दिसायचा. अंगणात सकाळी चिऊताई यायचीच. पण, वाढत्या सिमेंटच्या जंगलात चिऊताई दिसेनाशी झाली. म्हणूनच बर्ड सॉंग आणि खोपा बर्ड हाऊसतर्फे गेल्या काही वर्षांपासून चिमणी संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून चिमणी गणना केली जाते. यंदाच्या उपक्रमात 19 शाळेतील 313 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात 161 मुले आणि 152 मुलींचा सहभाग होता. प्रत्येक विद्यार्थ्यांना फॉर्म देण्यात आले होता. आपल्या घराच्या परिसरात जितक्‍या चिमण्या दिसतील त्याची नोंद यावर केली जात होती.


शहरात गर्दीच्या ठिकाणी चिमण्यांची संख्या अधिक दिसून आली नाही. मात्र, हरिपूर, धामणी, शंभरफुटी रस्ता परिसरात चिमण्यांची संख्या दिसून आली. मोबाईल टॉवर असणाऱ्या परिसराचा समावेशही यात करण्यात आला होता. मोबाईल टॉवर परिसरात तब्बल 5 हजार 177 चिमण्या दिसून आल्या. महापालिका क्षेत्रात 8 हजार 743, तर उपनगरात 2 हजार 106 चिमण्यांची नोंद झाली.
 

हे वाचा- चिंताजनक! `येथे` लाखोंची उलाढाल थांबली

याशिवाय पक्षी संवर्धनासाठी कृत्रिम घरटी लावण्यात आली आहे. त्याठिकाणीही चिमण्या दिसून आल्या. खोपा बर्डतर्फे सहा हजार कृत्रिम घरटी शहरात लावण्यात आली आहेत. त्यासाठी चिमणीसह पाच जातीच्या पक्ष्यांनी ती घरटी स्विकारल्याची नोंद आहे. या उपक्रमात शरद आपटे, सचिन शिंगारे, सुनीला शिंगारे, शंकर शेलार, अनिष कानीटकर, मिहीर पोंक्षे, विश्‍वनाथ मारूळी, कृष्णा कोरे, संजय पोंक्षे यांचा सहभाग होता.

चिमणी गणनेची आकडेवारी
0 सन 2009 - 4807
0 सन 2013 - 6709
0 सन 2015 - 2783
0 सन 2017 - 3170
0 सन 2018 - 11051
0 सन 2019 - 12045
0 सन 2020 - 10849
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

योग गुरूचा १७ वर्षीय मुलीसह ८ महिलांवर अत्याचार, अल्पवयीन पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर सगळा प्रकार उघडकीस

Maharashtra Health Alert: राज्यात असंसर्गजन्य आजारांचा धोका; मधुमेह, दमा, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ

Big Revelation in Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! सायलीच खरी तन्वी! अर्जुनला सत्यासाठी पोहचला थेट बायकोच्या शाळेत

Girish Mahajan : ठाकरे ब्रॅन्ड नामशेष झाला, आगामी निवडणुकीत बॅन्ड वाजणार; गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

Pimpri News : नागरी सुविधा केंद्राला मुदतवाढ, नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत अप्पर तहसीलमध्ये सेवांचा पुरवठा सुरूच

SCROLL FOR NEXT