old man died by stabbing Incident at Mattiwade nipani crime news 
पश्चिम महाराष्ट्र

मत्तीवडे गावामध्ये पसरला सन्नाटा : फुटबर बांधासाठी वृद्ध शेतकऱ्याचा खुरप्याने केला खून

सकाळ वृत्तसेवा

संकेश्वर (निपाणी) : हुक्केरी तालुक्यातील मत्तीवडे गावातील उंदुरे मळ्यामध्ये खुरप्याने वार केल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. २६) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अप्पासाहेब कृष्णा उंदुरे (वय 72) असे मयताचे नाव आहे. विष्णू मल्लाप्पा उंदुरे (वय 75) असे संशय़िताचे नाव आहे. शेताच्या बांधावरून असलेल्या वादातून हे कृत्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संकेश्वर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, 
मत्तीवडे गावातील उंदुरे मळ्यामध्ये वास्तव्यास असलेल्या विष्णू मल्लाप्पा उंदुरे व अप्पासाहेब कृष्णा उंदुरे यांच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून शेताच्या बांधावरून वाद होता. त्यातून अप्पासाहेब कृष्णा उंदुरे यांच्यावर विष्णू मल्लाप्पा उंदुरे याने आपल्या हातातील खुरप्याने वार केला. उजव्या पायाला गंभीर इजा झाल्याने त्यांना तातडीने गडहिंग्लज येथील रेडेकर रूग्णालयात दाखल केले होते. पण उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच संकेश्वरचे पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगेनहळ्ळी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संशयित विष्णू मल्लाप्पा उंदुरे याला ताब्यात घेतले आहे. लक्ष्मण अप्पासाहेब उंदुरे यांनी घटनेची फिर्याद दिली आहे. अधिक तपास संकेश्वर पोलिस करत आहेत. 

खूनाची माहिती मिळताच मत्तीवडे गावातील नागरिक घटनास्थळी एकत्र आले. त्यामुळे काहीवेळ गावामध्ये शांतता पसरली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
बेळगाव जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून करून मृतदेह शनिवारी (ता. २७) नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अप्पासाहेब उंदुरे यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT