Sangli Crime News esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राच्या वडिलांचा दगडाने ठेचून निर्घृण खून

पैशास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणातून हा खून करण्यात आला

सकाळ डिजिटल टीम

माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील कंजारभाट वस्तीवरील रस्त्यावर ही घटना घडली. डोक्यात मोठ्या प्रमाणावर इजा झाल्याने अतिरक्तस्त्राव होऊन सुनील यांचा मृत्यू झाला.

सांगली : दारूसाठी (Liquor) पैसे न दिल्याने वृद्धाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला. सुनील श्रीरंग तरटे (वय ६५, राजगुरुनगर झोपडपट्टी, शनिवार पेठ, माधवनगर) असे त्या वृद्धाचे नाव आहे. माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील कंजारभाट वस्तीवर शुक्रवारी (ता. ११) रात्री ही घटना घडली.

खुनाची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी (Sangli Rural Police) घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आठ तासांत संशयितास ताब्यात घेतले. विशाल अनिल देसाई (२३, राजगुरुनगर झोपडपट्टी, शनिवार पेठ, माधवनगर) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित विशाल देसाई आणि मृत सुनील तरटे माधवनगर येथील राजगुरुनगर झोपडपट्टी येथे राहतात. काल रात्री साडेनऊच्या सुमारास विशालने मृत सुनील यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. सुनील यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा चिडलेल्या विशालने डोक्यात दगड घालून त्यांचा निर्घृण खून केला.

माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील कंजारभाट वस्तीवरील रस्त्यावर ही घटना घडली. डोक्यात मोठ्या प्रमाणावर इजा झाल्याने अतिरक्तस्त्राव होऊन सुनील यांचा मृत्यू झाला. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ‘सांगली शहर’चे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, ‘ग्रामीण’चे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मृत सुनील यांचा मुलगा गणेश तरटे (२४) याने फिर्याद दिली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सहायक निरीक्षक सुशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार संतोष माने, मेघराज रूपनर, सुशील मस्के, सचिन कोळी, हिम्मत शेख, रणजित घारगे, विठ्ठल माने, विष्णू काळे, संजय बनसोडे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत संशयित विशाल देसाई याला आठ तासांत ताब्यात घेतले. दरम्यान, त्याला आज न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहायक निरीक्षक सुशांत पाटील अधिक तपास करत आहेत.

मित्राच्या वडिलांनाच मारले

फिर्यादी गणेश तरटे आणि संशयित विशाल देसाई हे दोघे मित्र होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दोघेही हमाली करत होते. एकाच ठिकाणी कामाला जात होते. कामावरून घरी परतल्यानंतर विशाल हा दारू पिण्यासाठी जायचा. त्याला वारंवार सांगूनही ऐकत नव्हता. काल सायंकाळी तो निघाला होता. त्या वेळी गणेश याचे वडील त्या ठिकाणाहून निघाले होते. पैशास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणातून हा खून करण्यात आला. प्राथमिक तपासात ही माहिती समोर आली असली, तरी पोलिस कसून तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT