Work from home sakal
पश्चिम महाराष्ट्र

ओमीक्रॉनची धास्ती; 'वर्क फ्रॉम होम’ एप्रिलपर्यंत?

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शहरातील अनेक तरुण-तरुणी पुणे, मुंबई, बंगळुरसारख्या शहरातील आयटी कंपनीत काम करतात. कोरोनामुळे दोन वर्षापासून आयटी कंपन्यांतील कामगारांना घरातूनच काम करण्याच्या (Work from home) सुचना दिल्या होत्या. त्यांचे अजूनही घरातूनच काम सुरु असून कोरोनाचा (corona) संसर्ग पुन्हा वाढत असल्याने अजून काही महिने त्यांना घरातूनच काम करावे लागणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी संसर्ग टाळण्यासाठी मोठ-मोठ्या शहरातील आयटी कंपन्यांनी आपल्या कामगारांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. मात्र, पुन्हा दुसरी लाट व आता पुन्हा रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने त्या कामगारांना पुन्हा घरातूनच काम करण्याच्या सुचना केल्या आहेत. पुणे, मुंबई, बंगळूरसारख्या शहरात आयटी कंपन्या आहेत. हजारो कर्मचारी व अधिकारी या कंपन्यांमध्ये काम करतात. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने विशेष दक्षता घेण्याची भुमिका या कंपनी चालकांनी घेतली आहे.

आयटी कंपन्यांचे बहुतांश काम हे इंटरनेट आणि संगणकावर चालते. घरी, इंटरनेट, संगणक अथवा लॅपटॉप असल्यास आयटी कर्मचाऱ्यांना घरात बसून त्यांचे ऑफीसचे काम करता येते. पण कंपनीत अनेक कर्मचारी एकत्र येत असल्याने विषाणू संसर्गाची भिती आहे.

''दोन वर्षापासून आयटी कंपन्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु आहे. जानेवारीत कर्मचाऱ्यांना कामावर येण्याच्या सुचना काही कपन्यांनी केल्या होत्या. मात्र, ओमीक्रॉनमुळे पुन्हा एप्रिलपर्यंत कामावर रुजू होणे पुढे ढकलले आहे.''

-अमित देसाई, सॉप्टवेअर इंजिनिअर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT