leopard in karad taluka 
पश्चिम महाराष्ट्र

सातारा : जखिणवाडीत बिबड्याची दहशत

राजेंद्र ननावरे

मलकापूर (जि. सातारा) ः जखिणवाडी (ता. कऱ्हाड) येथील मुख्य रस्ता ओलांडून जाताना बिबट्याचे दर्शन झाले. अवघ्या दोन फुटावरून बिबट्या दिसल्याने वाहनचालक, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  याच परिसरात आठवड्यापूर्वी कुंपनावरून उडी मारून बिबट्याने हल्ला करत भरवस्तीत बंगल्यातील पाळीव श्वान ठार केले होते. 

 जखिणवाडी येथील रहिवाशी नानासो श्रीरंग कणसे हे आठच्या सुमारास जखिणवाडी येथून कऱ्हाडला कामानिमित्त निघाले होते. जखिणवाडीच्या मुख्य रस्त्याला असणाऱ्या कृष्णानगर परिसरात ते आले असता अचानकपणे त्यांच्या दुचाकी समोरून बिबट्या रस्ता ओलांडून जाताना त्यांना दिसला.

अवघ्या दोन फुटावरून बिबट्या गेल्याने ते घाबरले. रस्त्यावर पुढेमागे कोणीच नसल्याने त्यांनी गाडीचा वेग वाढवला काही अंतरावर गेल्या नंतर त्यांना पुढे दुचाकीस्वार दिसले. त्यांना कणसे यांनी बिबट्या दिसल्याचे सांगितले. 


 या परिसरात ये- जा करणारे जीव मुठीत घेऊनच प्रवास करत होते. भरवस्तीमध्ये  बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. याच परिसरामध्ये वारंवार बिबट्याने शेळ्या ठार केल्या आहेत.

आठवड्यापूर्वी येथील नलवडे-पाटील यांच्या मालकिचे 50 हजार रुपये किमतीचे जर्मन शेफर्ड श्वान बिबट्याने फस्त केले होते. बिबट्या प्रत्यक्षात दिसल्यामुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा. या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी; राज्य सरकारचा मोठा निर्णय, पण ॲलोपॅथिक डॉक्टरांचा विरोध

Stock Market IPO : या IPO ला तब्बल 1000 पट सब्स्क्रिप्शन; GMP मध्येही चमक, गुंतवणूकदारांना पैसा डबल करण्याची संधी?

Pune Election : तीन दिवसांत ६७२ अर्ज नेले; नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारांची गर्दी; मात्र प्रत्यक्षात फक्त एक अर्ज दाखल!

Ambegaon Political : युती-अनिश्चिततेत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; बालाजीनगर प्रभागात पाचही जागा स्वबळावर लढवणार!

Latest Marathi News Live Update : बर्च बाय रोमियो लेन आग प्रकरणातील लुथरा ब्रदर्स यांच्या पोलीस कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT