patan 
पश्चिम महाराष्ट्र

दारुच्या नशेत भरधाव गाडी चालवत 5 जणांना उडविले; एकाचा मृत्यू

जालींदर सत्रे

पाटण (सातारा) : दारुच्या नशेत भरधाव चारचाकीने रस्त्याशेजारी वाढदिवसाचा फ्लेक्स लावत असलेल्या पाचजणांना उडविले आहे. अडुळपेठ (ता. पाटण) येथे रात्री ११ वाजता ही घटना घडली असुन एकाचा मृत्यु, एकजण गंभीर व तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. साहिल दिनकर निवडुंगे असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. जखमींवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, एका मित्राच्या वाढदिवसाचा फ्लेक्स कराड-चिपळुण महामार्गालगत २० फुट अंतरावर अडुळपेठ येथे २० ते २५ जण रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान लावत होते. त्यावेळी नवारस्त्याहुन पाटणकडे येणाऱ्या चारचाकी तवेरा गाडीचालकाने दारुच्या नशेत या तरुणांच्या आंगावर गाडी घातली. यामध्ये पाचजण जखमी झाले. 

जखमींना तात्काळ कृष्णा रुग्णालय कराड येथे उपचारासाठी दाखल केले. त्यामध्ये साहिल दिनकर निवडुंगे (वय १९) याचा रात्री उपचारा दरम्यान मृत्यु झाला. जखमी इतर चार पैकी महेश दत्तात्रय शिर्के (वय १९) गंभीर जखमी झालेला आहे. रविंद्र शिवाजी नलवडे (वय २०), गणेश रामचंद्र शिर्के (वय १८) व किशोर दत्तात्रय शिर्के (वय १८) हे किरकोळ जखमी झाले असुन त्यांच्यावरही उपचार करण्यात येत आहेत. या घटनेची नोंद पाटण पोलिसात अजुन झाली नसुन अडुळ गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यपदाचा राजीनामा? सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

Ram Shinde: हरित क्रांतीचा नवा अध्याय : विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, १८७६ दुर्मिळ देशी वृक्षांची लागवड

Pune News: राज्यात धरणसाठा ६० टक्क्यांवर; पुणे विभागात मुबलक पाणी, जोरदार पावसाने काही भागांत पूरस्थिती

Kolhapur : कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी शासनाची पुढची स्टेप, पालकमंत्री आबिटकरांनी कायदेशीर त्रुटी दूर करण्यावर दिला भर

संतापजनक! आळंदीत वारकरी संस्थेत तरुणीवर बलात्कार, किर्तनकार महिलेसह कुटुंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT