one dies after falling from construction in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

वास्तुशांतीआधीच काळाचा घाला; महाशिवरात्रीदिवशीच घेतला अखेरचा श्वास 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर काही कामानिमित्त गेलेल्या एकाचा तोल जाऊन मृत्यू झाला. ही घटना जुने बेळगाव येथे आज सायंकाळी घडली. वामन चौगुले (वय 63) असे मृत झालेल्यांचे नाव आहे. ऐन महाशिवरात्रीदिवशी ही घटना घडल्याने परिसरात दुःखाची छाया पसरली होती. 

येथील खन्नूकर गल्लीत सुरू असलेल्या आपल्या घराच्या बांधकामावर वामन चौगुले हे काही कामानिमित्त गेले होते. इमारतीच्या पायरीवर पाणी साचले होते. त्यामुळे अचानकपणे तोल जाऊन ते कोसळून खाली पडले. या घटनेत ते जबर जखमी झाले. त्यांच्या कुटुंबीयानी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविले. मात्र उपचार सुरू असतानाच 7.30 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. याबाबत त्यांच्या पत्नी सुमन चौगुले यांनी शहापूर पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. चौगुले यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

वास्तुशांतीआधीच.... 
चौगुले यांच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. पुढील महिन्यात 21 रोजी वास्तुशांती होती. त्यासाठी अपुरी कामे उरकण्याची लगबग सुरूच होती. त्यापूर्वीच वामन चौगुले यांचे अपघाती निधन झाल्याने चौगुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Plane: मोठा अपघात! कॅनडा एक्सप्रेस विमानाला अग्निशमन दलाच्या ट्रकची जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक प्रवासी जखमी

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील हस्तक्षेप भोवला, पोलिस अधीक्षक तुषार दोषींसह १०० पोलिसांच्या निलंबनाचे आदेश

Uttar Pradesh: UP ATS चा धडाका! देवबंदमध्ये मोठी कारवाई; संशयास्पद व्हिडिओ आणि इराण-पाकिस्तान कनेक्शनची चर्चा

Premium|Artificial Intelligence Investment : एआय गुंतवणुकीतून आयटी क्षेत्राला धक्का; भारतीय कंपन्यांसमोर आव्हान

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघात विदर्भाच्या पठ्ठ्याला मिळाली संधी; 'या' टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या जागेवर खेळणार

SCROLL FOR NEXT