one killed in belgaum hukkeri 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक - अनैतिक संबंधच ठरले 'त्याच्या' मृत्यूचे कारण 

सकाळ वृत्तसेवा

हुक्केरी (बेळगाव) - नरसिंगपूर (ता. हुक्केरी) येथे अनैतिक संबंधातून तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. बिरप्पा विठ्ठल कमते (वय 27) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा -  बिदरमधील ते 11 जण निघाले कोरोना पॉझिटीव्ह... 
 
याबाबत घटनास्थळावरुन व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गावातीलच एका महिलेबरोबर बिरप्पा कमते याचे अनैतिक संबंध होते. त्याची माहिती महिलेच्या घरच्या लोकांना समजली होती. त्या रागातून महिलेच्या कुटुंबातील सदस्य बिरप्पा दुंडप्पा बडाई (वय 35), सत्येप्पा सिद्धप्पा बडाई (वय 25) या दोघांनी बुधवारी (ता. 1) रात्री 7.45 च्या सुमारास बिरप्पा कमतेचा पाठलाग करून गावाच्या स्नशानभूमीजवळ त्याला बांधून बेदम मारहाण करून तीक्ष्ण हत्याराने त्याचा खून केला. बिरप्पाचा मामा भीमराव पुंडलिक हेगडे यांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर उपनिरीक्षक रमेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर यमकनमर्डी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिस ठाण्यात झाली आहे. 

दरम्यान, या घटनेने नरसिंगपूर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिस घटनेची अधिक चाैकशी करत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT