पश्चिम महाराष्ट्र

बाप्पांसाठी सव्वापाचशे गावांत एकोपा 

सकाळवृत्तसेवा

सातारा - तंटामुक्त गाव अभियानाप्रमाणे पोलिस विभागाचा "एक गाव- एक गणपती' उपक्रमही राज्यबर गाजला. संपूर्ण गाव एकत्रित येऊन एकच सार्वजनिक गणपती बसवत असल्याने गावात एकोपा वाढण्यास मदत होत असते. यावर्षीही जिल्ह्यातील 522 गावांत "एक गाव- एक गणपती' उपक्रम यशस्वीपणे सुरू राहिला आहे. शिवाय, या गावांमध्ये सामाजिक उपक्रमांनाही मिळत आहे. 

पोलिस खात्याने "एक गाव एक गणपती' हा अभिनव उपक्रम राज्यभरात काही वर्षांपूर्वी राबविण्यास सुरवात केली. प्रारंभी त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळाले नव्हते. नंतर मात्र पोलिस खात्यानेही हा उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले. त्यातून या उपक्रमाला अधिक बळ मिळत गेले. परिणामी, या उपक्रमात गावांची संख्या वाढू लागली. निवडणुका व सण उत्सवाच्या काळात अपुऱ्या मनुष्यबळाअभावी पोलिस यंत्रणेवर ताण येतो. गणेशोत्सवात यात अधिकच भर पडते. मात्र, या उपक्रमामुळे हा ताण थोडा हालखा होण्यास मदत मिळत आहे. शिवाय, गावात एकोपा, शांतता व सद्‌भाव वाढीस लागतो आहे. 

पोलिसांच्या वतीने उत्सव शांततेत, कायद्याच्या चौकटीत साजरा करणाऱ्या, सामाजिक सलोखा निर्माण करणारे देखावे व शांततापूर्ण मार्गाने मिरवणुका काढणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना गणराया ऍवार्ड देऊन गौरविले जाते. त्याचे चांगले परिणाम होत असून, पोलिस व कार्यकर्त्यांत सुसंवाद वाढत आहे. 

मेढा ठाण्यात सर्वाधिक  
सातारा शहर एक, सातारा ग्रामीण 41, बोरगाव 17, कऱ्हाड ग्रामीण 34, तळबीड तीन, उंब्रज 25, वाई 33, महाबळेश्‍वर 16, पाचगणी 14, मेढा 74, भुईंज 25, कोरेगाव 12, पुसेगाव 24, रहिमपूर दहा, वाठार 22, वडूज 12, दहिवडी 23, म्हसवड 16, औंध सात, फलटण शहर एक, फलटण ग्रामीण सहा, लोणंद 18, खंडाळा दहा, शिरवळ 13, पाटण 26, कोयनानगर 14, ढेबेवाडी 25. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT