one woman dead in belgaum for lose a election in belgaum
one woman dead in belgaum for lose a election in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून तिने उचलेले धक्कादायक पाऊल

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : ग्रामपंचायत अध्यक्ष निवडणुकीत पराभव झाल्याने निराश झालेल्या विवाहितेने माहेरी येऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल (ता. १२) मन्नीकेरी (ता. बेळगाव) येथे घडली. यल्लूताई मारुती गावडे (वय ३२, रा. सोनारवाडी ता. चंदगड) असे त्यांचे नाव आहे. घटनेची नोंद काकती पोलिसांत झाली आहे.

यल्लूताई यांचे माहेर मन्नीकेरी असून सोनारवाडी (ता.चंदगड) हे त्यांचे सासर आहे. चंदगड तालुक्‍यातील सोनारवाडी येथून ग्राम पंचायत निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या होत्या. तर अध्यक्षपदासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे काही दिवसांपासून त्या 
निराश बनल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी वडिलांनी त्यांना मोहेरी बोलावून आणले होते.

शुक्रवारी रात्री त्यांनी मन्नीकेरी येथे माहेरी एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी मयत यल्लूताईंची आई मल्लव्वा शिवमूर्ती सनदी यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. जिल्हा रुग्णालयातील शवागृहात शल्यचिकित्सा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT