one year child dead in leopard attack in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

कोयता हातात घ्यायला आलो आणि माझ्या पोराला गमावून बसलो

शिवाजीराव चौगुले

शिराळा (सांगली) : गेले वर्षभर तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलेला काळजाचा तुकडा क्षणार्धात डोळ्यांसमोर मातीआड झाला. चिमुकल्याच्या आठवणीने घायाळ झालेले माता पित्याने जड अंतःकरणाने बाळाचा चेहरा डोळ्यात साठवला. आठवणींना हृदयात ठेवून तडवळे गावचा निरोप घेतला. पोराच्या शिक्षणाची आभाळभर स्वप्न घेऊन बाहेर पडलेल्या आई वडिलांवर नियतीने अशी वेळ आणली. पाहिलेल्या स्वप्नांना तिथेच ठेवून, बाळाच्या आठवणींना सोडून पुन्हा माघारी फिरण्याची वेळ आली. खोपट्यावर भयाण शांततेच्या वातावरणात सर्वांच्या कडा पाणावल्या होत्या. 

आपल्या नशिबी आलं ते आपल्या पोरांच्या नशिबी येऊ नये म्हणून दोघे रात्रंदिवस काबाडकष्ट करत आहेत. मुलांना शिक्षण देऊ अशी इच्छा मनी ठेवून हातात कोयता घेवून आनंदगाव (ता. माजलगाव, जि. बीड) येथील शमशुद्दीन शेख आपल्या पत्नी आणि एक वर्षाच्या सुफीयानसह घराबाहेर पडले. शिराळा तालुक्यात ऊसतोड मजूर म्हणुन दाखल झाले. मुलगी चार वर्षांची असल्याने गावी असते.

संसार सुखाने सुरू होता. नेहमीप्रमाणे तोडणीचे काम सुरू होते. मात्र सोमवार २२ फेब्रुवारीचा दिवस त्यांच्यासाठी काळ बनून आला. अशी धक्कदायक घटना आपल्या आयुष्यात घडेल याची पुसटशी कल्पनाही त्यांनी कधी केली नव्हती. सोमवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास शमशुद्दीन शेख पत्नी आणि मुलासह ऊस तोडणीसाठी तडवळे येथील शेतात गेले होते. मानकांडे शेतात कृष्णात पाटील यांचा ऊस तोडत असताना, मुलगा सुफीयानला निलगिरी झाडाखाली सावलीला बसवले होते. मेव्हणीची सात वर्षाची मुलगी तरनुम त्याच्यासोबत होती. सर्वजण ऊस तोडण्यात मग्न होते. तरनुम पाणी पीत असताना अचानक उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाठीमागून सुफीयानवर झडप घातली. मानेला पकडून फरफट नेले, त्यातच त्याचा मृत्यू झाला. हे भयानक दृश्य त्या दुर्दैवी आई वडिलांसमोरच घडले.

शोककळा पसरलेल्या कुटुंबियांवर गाव जवळ नसल्याने शिराळा येथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. या घटनेने चार दिवस ऊसतोडणी मजुरांच्या खोपटावर शांतता होती. ऊस तोडणी बंद होती. ज्याच्यासाठी राबायंच तोच नाही, आता इथे राहून काय करु ? या वाक्याने वस्तीवरील सारेच हळहळले. इथे राहिलो तर बाळाच्या आठवणी सतावत रहतील. असे म्हणत शेख कुटुंबाने कोयता सोडून, घरी जाण्याचा निर्णय घेतला. बाळाचा चेहरा डोळयांत साठवून त्याच्या आठवणी उराशी बाळगत गावची वाट धरली. निरोपाच्या या क्षणाला खोपट्यावर असणारे सर्वजण गहिवरले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Kolhapur Dussehra : कोल्हापूरसाठी 'हा' कसला मानाचा तुरा, म्हणे राज्याचा प्रमुख महोत्सव; शाही दसऱ्यासाठी निधीच नाही

World Wrestling Championship 2025 : भारताच्या सुजीतची कडवी झुंज अपयशी, ऑलिंपिक विजेत्या रहमानचा ६-५ने विजय

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

SCROLL FOR NEXT