पश्चिम महाराष्ट्र

अफगाणमधील केळी निर्यातीच्या ऑर्डर रद्द! तालिबानी राजवटीचा परिणाम

- राजेंद्र हजारे

जवळपास २८ ते ३० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती केळी व्यापाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.

निपाणी (बेळगाव): सध्याच्या अफगाणिस्तानावरील तालिबानी वर्चस्वामुळे आगामी काळात केळी निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता व्यापारीवर्गातून वर्तवली जात आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण केळीपैकी तीस टक्के केळी अफगाणिस्तानात जातात. सध्या अफगाणिस्तानात सुरू असलेल्या परिस्थितीचा चिक्कोडी, निपाणी तालुक्यांतील केळी उत्पादकांना फटका बसला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अफगाणिस्तानमधील १० कंटेनरची केळीची ऑर्डर होती. परंतु सर्व ऑर्डर रद्द झाले आहे. त्यामुळे जवळपास २८ ते ३० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती केळी व्यापाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.

चिक्कोडी व निपाणी तालुक्यांतील केळीला विशिष्ट चव व उत्तम दर्जा असल्याने आखातासह इतर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. परंतु कोरोनाबरोबर नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत असताना अफगाणिस्तानवरील तालिबानी वर्चस्वामुळे केळी निर्यातीत घट झाल्यास त्याचा फटका केळी उत्पादकांना बसणार आहे. कोरोनामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक बंद राहिल्याने प्रचंड नुकसान सहन करावे लागले. त्यानंतर केळीच्या दरात तेजी आली. परंतु अफगाणिस्तानवरील तालिबानी वर्चस्वानंतर तेथील अर्थव्यवस्था मोडकळीस आली. जोपर्यंत तेथील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत निर्यात चालू होण्याची शक्यता कमी आहे. अफगाणिस्तान हा इराणनंतरचा सर्वांत मोठा भारतातून केळी आयात करणारा देश आहे. निर्यात थांबल्याने चिक्कोडी, निपाणी तालुक्यांतील केळी उत्पादकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरला बेळगाव जिल्ह्यातून अफगाणिस्तानमध्ये ५० कंटेनरची केळीची ऑर्डर होती. त्यात चिक्कोडी, निपाणी तालुक्यांतील १० कंटेनरचा समावेश होता. तेथे तालिबानी राजवट आल्याने सुरू असलेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे सर्व ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. या केळींची निर्यात न झाल्यास मोठ्या नुकसानीस केळी उत्पादक व व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागेल.

- मन्सूर मुल्ला, केळी व्यापारी, बेळगाव

ठळक बाबी

- एका कंटेनरमध्ये २० टन केळी

- चिक्कोडी, निपाणी तालुक्यांत ४० केळी उत्पादक

- दोन्ही तालुक्यांत १५० एकरांत केळीची लागवड

- कच्ची केळी १४ हजार रुपये टन

- ३० लाखांचा फटका

- स्थानिक पातळीवर २५ ते ३० रुपये दर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT