Onion costs Rs 57 per kg 
पश्चिम महाराष्ट्र

कांद्याला किलोला 57 रुपयांचा दर 

संजय आ. काटे

श्रीगोंदे : गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या चैतन्य खासगी बाजार समितीत तालुक्‍यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. आज तेथे पाच हजार गोण्यांची विक्रमी आवक झाली. कांद्याला 57 रुपयांपर्यंत किलोमागे दर मिळाला. शहरापेक्षा चांगला दर तेथे मिळत असल्याने कांदाउत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

विठ्ठलराव वाडगे व सुदाम तागड यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या चैतन्य समितीत आज झालेल्या कांदा लिलावात चांगल्या कांद्याचा दर किलोमागे 57 रुपयांपर्यंत गेला. आज जिल्ह्यासह पुण्यातून आलेला कांदा चांगल्या दराने विकला गेल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी "सकाळ'कडे व्यक्त केली. त्यातच शेतकऱ्यांना लगेच पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 
वाडगे म्हणाले, की चांगल्या कांद्याला कायमच योग्य दर दिला जाईल. कुठल्याही शेतकऱ्यांचे पैसे त्याच दिवशी अदा केले जातात. या समितीत आता शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात चहा, नाश्‍ता व जेवणाची सोय केली जाईल. नफ्यापेक्षा शेतकऱ्यांचे समाधान जपण्याचा आमचा प्रयत्न राहील. 

श्रीगोंद्याच्या बाजार समितीला इशारा 
कांद्याचे दर वाढल्यानंतर श्रीगोंदे बाजार समितीचे सगळे लिलाव बंद होतात. याहीवेळी तीच स्थिती असून, सहा महिन्यांपासून श्रीगोंद्यासह चिंभळे येथील अधिकृत कांदा बाजार बंद आहेत. चैतन्य समितीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढल्याने सरकारी अनुदान घेणाऱ्या बाजार समितीच्या सत्ताधारी व अधिकाऱ्यांना ही मोठी चपराक आहे. 

पारदर्शी बाजार समिती सुरू 
तालुक्‍यात कांद्याचे विक्रमी उत्पादन होते. आता चैतन्यच्या रूपाने चांगले व पारदर्शी बाजार समिती सुरू झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल. 
- रावसाहेब खेडकर, सहायक निबंधक, श्रीगोंदे 

शेतकरी समाधानी 
कांद्याच्या लिलावात पारदर्शीपणा असतोच; शिवाय शहराच्या तुलनेत चांगले दर मिळतात. कांद्याची पट्टी लगेच मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. 
- राजेंद्र गायकवाड, शेतकरी, चिंभळे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Case : निलेश घायवळ प्रकरणात आता ईडीची एन्ट्री; जमीन व्यवहारातील कोट्यवधींच्या उलाढालीचा तपास होण्याची शक्यता

Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेस सरकार संकटात? 'नोव्हेंबर क्रांती'च्या चर्चांना वेग, डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार?

Chandrakant Khaire: पवार काँग्रेस सोडून ठाकरेंसोबत येतील; चंद्रकांत खैरेंनी सकाळ कार्यालयात केले अनेक गौप्यस्फोट..

सरकारची 'भारत टॅक्सी' सेवा, पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरू; प्रवासी आणि चालकांनाही होणार फायदा

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन; माजी मंत्री बच्चू कडू शेतकरी नेत्यांसह आज सरकारसोबत चर्चा करणार?

SCROLL FOR NEXT