Onion price in Sangli market is Rs. 50 per kg 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीच्या बाजारात कांदा 50 रूपये प्रतिकिलो 

घनशाम नवाथे

सांगली : दिवाळीनंतर आता कुठे कांद्याचे दर स्थिर होत असतानाच पुन्हा एकदा आवक मंदावली आहे. आवक कमी झाल्यामुळे बाजारातील कांद्याचा दर वाढला आहे. किरकोळ बाजारातील कांद्याचा दर 30 ते 40 रूपये किलोवरून 50 रुपये किलोवर गेला आहे. घाऊक दरही वाढत असल्याचे दिसून येते. 

ऐन दिवाळीत कांद्याचा दर भडकला होता. बाजारात शंभर रूपये किलोपर्यंत दर गेला होता. त्यानंतर हळूहळू दर कमी होत गेले. आठवड्यापूर्वीपर्यंत बाजारात किरकोळ विक्रीचा दर 30 ते 40 रूपये किलो होता. परंतू तीन-चार दिवसापासून कांदा दरात पुन्हा वाढ होत चालली आहे. आवक कमी होवू लागल्याने दर वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या किरकोळ बाजारात कांदा 50 रूपये किलो झाला आहे. मध्यम कांदा 40 रूपये झाला आहे. 

घाऊक कांदाही वाढत आहे. गेल्या आठवड्यात हजार रूपये क्विंटल असलेला कांदा सध्या दीड हजार रूपये क्विंटल इतका झाला आहे. मध्यम कांद्याचा दर दोन ते अडीच हजार रूपये तर चांगला कांदा तीन हजार ते तीन हजार दोनशे रूपये इतका होता. त्यामध्ये वाढ झाली आहे. बाजारात आठवड्यापासून कांद्याची आवक घटली आहे. परिणामी दरात वाढ झाली. आजच्या सौद्यात चांगल्या कांद्याचा दर चार हजार दोनशे रूपये क्विंटल होता. 

डोळ्यात पुन्हा पाणी येणार 
मध्यम कांद्याचा दर 2850 रुपये निघाला. तर दोन हजार 460 क्विंटल आवक झाली. एकीकडे कांदा लागवडीचा दरही वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. तशातच बाजारातही दर वाढला आहे. त्यामुळे सामान्यांच्या डोळ्यात कांदा पुन्हा पाणी आणणार? असे चित्र दिसून येते.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT